ऑनलाइन शिक्षणात गरीब विद्यार्थी माघारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:01:08+5:30

या परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून काही मोजक्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. ज्यांची परिस्थिती चांगली असेल त्यांच्या पालकांकडे स्मार्ट मोबाईल असतील ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीला प्रतिसाद देतील. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल सुविधा उपलब्ध नाही ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Poor students will be left behind in online education | ऑनलाइन शिक्षणात गरीब विद्यार्थी माघारणार

ऑनलाइन शिक्षणात गरीब विद्यार्थी माघारणार

Next
ठळक मुद्देस्मार्ट फोन घेणे गोरगरीब पालकांच्या आवक्या बाहेर : विद्यार्थ्यांची होतेय अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार शहराप्रमाणे ग्रामीण भागातील शिक्षकांनी सुद्धा ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण देणे सुरु केले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडे स्मार्ट मोबाईल फोन आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रणालीचे शिक्षण शक्य आहे.परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत किंवा ते घेवू शकत नाही ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये माघारल्याशिवाय राहणार नाही. गरीब विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये कुचंबना होत आहे.
या परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून काही मोजक्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. ज्यांची परिस्थिती चांगली असेल त्यांच्या पालकांकडे स्मार्ट मोबाईल असतील ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीला प्रतिसाद देतील. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल सुविधा उपलब्ध नाही ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
गरज म्हणून केवळ शिक्षणासाठी महागड्या किंमतीच्या स्मार्ट मोबाईल खरेदी करणे गरीब विद्यार्थ्यांना शक्यच नाही. कोरोना विषाणूच्या महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन ३१ जुुुलैपर्यंत वाढविले आहे. परिणामी अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अशा अडचणीत उदरनिर्वाहासाठी कसरत करावी लागत आहे. यातच शहरी विभागासारखेच या ग्रामीण भागातील शाळांनी सुद्धा ऑनलाइन शिक्षण प्रणाली देण्याची सज्जता दाखविली आहे. यामुळे मात्र गरीब विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणप्रणालीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. काही विद्यार्थ्यांची कुंचबना होताना दिसत आहे.
या परिसरात शेतकरी, शेतमजूर अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्या पाल्यांना सात आठ हजार रुपये किमतीचा स्मार्ट मोबाईल खरेदी करुन देणे शक्य होणार नाही. या ऑनलाइन शिक्षणप्रणालीमध्ये ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी माघारल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: Poor students will be left behind in online education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.