गरीब विद्यार्थी रोज पाहतात ्रपोषण आहाराची वाट

By Admin | Updated: September 30, 2015 05:23 IST2015-09-30T05:23:14+5:302015-09-30T05:23:14+5:30

मागील १० ते १५ दिवसापुर्वीच पोषण आहाराचे तांदुळ व इतर खाद्य पदार्थ संपल्यामुळे सालेकसा तालुक्यातील अनेक

Poor students look forward to feeding nutrition | गरीब विद्यार्थी रोज पाहतात ्रपोषण आहाराची वाट

गरीब विद्यार्थी रोज पाहतात ्रपोषण आहाराची वाट

सालेकसा : मागील १० ते १५ दिवसापुर्वीच पोषण आहाराचे तांदुळ व इतर खाद्य पदार्थ संपल्यामुळे सालेकसा तालुक्यातील अनेक शाळांमध्ये मुलाना जेवण मिळणे बंद आहे. त्यामुळे गरीब आदिवासी परंतु जेवण न मिळाल्यास चिमुकल्या विद्यार्थ्यांचे चेहरे नाराज दिसत आहेत. शासनाकडून आहार पुरवठा होईपर्यंत मुख्याध्यापक कोणतीच वैयक्तिक व्यवस्था करीत नसल्याचे ही चित्र दिसून येत आहे.
पिपरीया क्षेत्राच्या जि.प. सदस्य दुर्गा तिरोले यांनी क्षेत्रात भेटी देण्याच्या दरम्यान ही बाब उघड झाली आहे. शासनाने वेळेपुर्वी आहार पुरवठा करवून देण्याची सोय करावी अशी मागणी तिराले यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चाही केली आहे.
केंद्र शासनाच्या शालेय पोषण अहार योजनेंतर्गत वर्ग १ ते ८ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व सरकारी व शासगी शाळामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण मिळणे गरजेचे आहे. परंतु अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की आहार पुरवठा करणारी यंत्रणा वेळेचा मान ठेवून योग्य वेळी किंवा त्यापुर्वी शाळांना आहार पुरवठा करुन देत नाही. त्यामुळे अनेक वेळा १० ते १५ दिवस शाळेत मुलांना दुपारचे जेवण मिळत नाही. सालेकसा तालुक्यात ही परिस्थिती नेहमी उद्भवत असते. मात्र याकडे संबंधीत अधिकारी पदाधिकारी सुद्धा जातीने लक्ष देताना दिसत नाही. शाळेत जर आहार संपला तर मुख्याध्यापकांनी तात्पुरती व्यवस्था करुन मुलांना जेवण उपलब्ध करुन दिला पाहिजे. यात ते दुसऱ्या शाळेतून संपर्क करुन किंवा दुकानातून नगदी घेवून करु शकतात. परंतु मुख्याध्यापकांना लहान मुलांवर अजिबात दया येत नाही असे ही अनेक ठिकाणी दिसून आले. यासाठी ते वेग वेगळी कारणे सांगून तात्पुरती व्यवस्था करण्याचे टाळतात. परंतु दुसरीकडे गरीब आदिवासी विद्यार्थी मुळे त्रास सहन करण्यास नाईलाज होतात. सालेकसा तालुक्यात दरेकसा केंद्रासह इतर मागास क्षेत्रामध्ये सध्या ही परिस्थिती दिसून येत आहे. संबंधीत अधिकारी यावर वेळेतच लक्ष घालावे अशी मागणी दुर्गा तिराले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Poor students look forward to feeding nutrition