दीनदुबळ्या वंचितांना कायद्याचे पाठबळ मिळावे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:32 IST2021-09-22T04:32:35+5:302021-09-22T04:32:35+5:30
बोंडगावदेवी : ग्रामीण भागातील दीनदुबळे, वंचित, सामान्यजणांना कायद्याची इत्थंभूत माहिती होऊन जनकल्याणकारी कायद्याची समस्त नागरिकांना जाणीव जागृती व्हावी. न्यायालयीन ...

दीनदुबळ्या वंचितांना कायद्याचे पाठबळ मिळावे ()
बोंडगावदेवी : ग्रामीण भागातील दीनदुबळे, वंचित, सामान्यजणांना कायद्याची इत्थंभूत माहिती होऊन जनकल्याणकारी कायद्याची समस्त नागरिकांना जाणीव जागृती व्हावी. न्यायालयीन प्रक्रियेत गोरगरिबांना कायदेविषयक मदत मिळून वंचितांना कायद्याचे पाठबळ मिळावे. समस्त नागरिक कायदेविषयक साक्षर व्हावे त्यांना आपल्या अधिकार, हक्क व कर्तव्याची जाणीव व्हावी यासंबंधी जनजागृती होण्यासाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा अर्जुनी-मोरगाव येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश प्रशिक सोनकांबळे यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती तसेच तालुका वकील संघाच्या संयुक्तवतीने बोदरा (देऊलगाव) येथे आयोजित कायदेविषयक जाणीवजागृती मार्गदर्शन शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमाला ॲड. गौरीशंकर अवचटे, ॲड. मोहन भाजीपाले, ॲड. हिरालाल तुळशीकर, ॲड. शहारे, ॲड. टी. डी. कापगते, ॲड. पोेमेश्वर रामटेके, ॲड. श्रीकांत बनपुरकर, सरपंच शंकर उईके उपस्थित होते.
ग्रामीण भागात कायद्याची जाणीव जागृती होण्यासाठी पिंपळगाव, खांबी, बोंडगावदेवी, बोदरा (देऊळगाव) या ठिकाणी तालुका विधी सेवा समितीच्यावतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. अवचटे यांनी, देशाच्या संसदेत व राज्याच्या विधानसभेत जे कायदे संमत होतात त्याची सविस्तर माहिती व जाणीव लोकांना व्हावी यासाठी शिबिराचे आयोजन होत असल्याचे सांगितले. शिबिरात कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे अधिकार, मूलभूत अधिकार, गरजूंना मोफत कायदेशीर मदत यासंबंधी माहिती देण्यात आली. शिबिरासाठी सहायक अधीक्षकांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ लिपिक हेमंत डोंगरवार, कनिष्ठ लिपिक चंद्रशेखर प्रधान यांनी सहकार्य केले.