समाजकारणात राजकारण येता कामा नये

By Admin | Updated: December 16, 2014 22:55 IST2014-12-16T22:55:29+5:302014-12-16T22:55:29+5:30

समाजाच्या हितासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे. आपला समाज हा अनेक शाखा, उपशाखेत विखुरलेला आहे. त्यामुळे संख्येने सर्वात मोठा समाज असूनही आपल्या समाजाची कुठेही दखल घेतली जात नाही.

Politics should not come in the field of politics | समाजकारणात राजकारण येता कामा नये

समाजकारणात राजकारण येता कामा नये

राम महाजन : शोभायात्रेसह तालुकास्तरीय कलार समाज संमेलनाची सांगता
देवरी : समाजाच्या हितासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे. आपला समाज हा अनेक शाखा, उपशाखेत विखुरलेला आहे. त्यामुळे संख्येने सर्वात मोठा समाज असूनही आपल्या समाजाची कुठेही दखल घेतली जात नाही. यासाठी संघटीत होण्याची गरज आहे. समाजसेवा करताना रक्ताचे पाणी करण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे, तरच समाजाची प्रगती शक्य आहे. समाजकारणातून राजकारण करणे यात काही गैर नसले तरी समाजकारणात राजकरण शिरता कामा नये, असे परखड मत साकोलीचे जेष्ठ साहित्यिक राम महाजन यांनी देवरी येथे आयोजित कलार समाजाच्या संमेलनप्रसंगी व्यक्त केले.
देवरी येथील माँ धुकेश्वरी मंदीर परिसरात रविवारी कलार समाजाच्या तालुकास्तरीय संमेलनाचे आयोजन श्री सहस्त्रबाहुू कलार समाज बहुउद्देशीय संस्था देवरीच्या वतीने करण्यात आले होते. या संमेलनानिमित्त सुरूवातीला माँ धुकेश्वरी मंदीरातून भगवान सहस्त्रबाहु अर्जुन यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी बहुसंख्येने समाजबांधव या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली देवरी गावातून प्रमुख मार्गाने भ्रमण करीत परत धुकेश्वरी मंदिर परिसरात परतली.
या संमेलनाचे उद्घाटन देवरीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने यांच्या हस्ते आणि नागपूरचे कलार समाजाचे संयोजक फाल्गून उके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी साकोलीचे जेष्ठ साहित्यीक राम महाजन, बालाघाटचे अखिल भारतीय कलार समाज संघटक नरेंद्र धुवारे, गोंदियाचे कलार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता सुरेश चौरागडे, ढाकणीचे बांगळू महाराज, गोंदिया जिल्हा कलार समाजाचे अध्यक्ष डॉ. रामनारायण भोयर, गोंदियाचे सामाजिक कार्यकर्ता चनिराम मेश्राम, देवरीचे माजी सभापती शोभा शेंडे, ककोडीचे माजी पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सुरसावत, देवरी ग्रा.पं. सदस्य रचना उजवणे, धुवारे, मिताराम देशमुख, मोहनलाल पाटणकर, देवानंद शहारे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक देवरी तालुका कलार समाजाचे अध्यक्ष डॉ. अनिल चौरागडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून चौरागडे यांनी देवरी तालुक्यातील आपल्या समाजाविषयी माहिती देऊन समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
या संमेलनात समाजाच्या लोकांच्या उपस्थित सर्वानुमते देवरी परिसरातील गरजू लोकांकरिता एक रुग्ण वाहिका भेट देण्याकरिता ठरविण्यात आले. याकरिता वर्गणीही गोळा करण्यात आली. याप्रसंगी देवरी एम.बी.पटेल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. भांडारकर, दयाराम बन्सोड आणि देवरी तालुक्यातील समाजातील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्यप्राप्त सहा विद्यार्थ्यांचे तसेच समाजातील डॉक्टर व वकील झालेले विद्यार्थी डॉ. स्नेहा चौरागडे, डॉ. रागिनी रामटेककर, डॉ, तिराले, दीपक कोसरकर, मुकेश शहारे त्याचप्रमाणे एम.बी.ए. केलेला विद्यार्थी मयूर बन्सोड आदींचे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुरेश मेश्राम यांनी केले.

Web Title: Politics should not come in the field of politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.