लग्न समारंभावरही राहणार पोलिसांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:23+5:302021-04-23T04:31:23+5:30
या आदेशात लग्नाची परवानगी घेणाऱ्यांनी लग्नात केवळ २५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य तो दंड ...

लग्न समारंभावरही राहणार पोलिसांची नजर
या आदेशात लग्नाची परवानगी घेणाऱ्यांनी लग्नात केवळ २५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य तो दंड व एफआरआय आदी कारवाई करण्याचे आदेशात सांगण्यात आले आहे. ज्यांना लग्नाची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या घरी प्रशासनाची चमू जाऊन कोरोना नियम समजून सांगतील. त्यांनतर लग्नाच्या वेळेवर पोलीस प्रशासन स्वत: उपस्थित राहून नियमांचे पालन होत आहे की नाही यावर करडी नजर ठेवणार आहे, जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर भारतीय दंडसंहितेच्या कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची कलम ५१, ५५, ५६ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. १९ एप्रिलला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारे हे निर्देश देण्यात आले आहे. यापूर्वी ५० व्यक्ती लग्नसमारंभात उपस्थित राहण्याची मंजुरी देण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचे वाढते संक्रमण व मृत्यूचे प्रमाण वाढल्याने केवळ २५ व्यक्तीच उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात प्रशासनाचे लक्ष कमी असल्याने बेधडक नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली असल्याने जिल्हा भीषण कोरोनाच्या संकटात सापडलेला आहे. अशातच लग्नसमारंभात बेजबाबदारपणाने वागणाऱ्यांवर कारवाईची आवश्यकता आहे.