बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांचा वाॅच ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:57+5:302021-04-22T04:29:57+5:30
तिरोडा : जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गोंदियापाठोपाठ सर्वाधिक रुग्ण तिरोडा तालुक्यात आहेत. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक ...

बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांचा वाॅच ()
तिरोडा : जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गोंदियापाठोपाठ सर्वाधिक रुग्ण तिरोडा तालुक्यात आहेत. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले असले, तरी नागरिक रस्त्यांवर फिरत होते. मात्र पोलिसांनी बुधवारपासून विनाकारण फिरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते सामसुम पडल्याचे चित्र दिसत आहे.
शासनाच्या निर्देशांचे पालन न करता अनेक नागरिक विनाकारण मोठ्या प्रमाणात ये-जा करीत आहेत. यावर आळा बसावा म्हणून तिरोडा पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे आता तिरोडा येथील नागरिकांची ये-जा कमी झाली आहे. यावर ठाणेदार योगेश पारधी स्वत: लक्ष घालून नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका अन्यथा पोलीस कारवाईस सामोरे जा, असा इशारा दिला आहे. पालकमंत्री नवाब मलिक यांनी गोंदिया येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरणारे नागरिक तथा आवश्यक सेवेच्या ठिकाणीही अनावश्यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून तिरोडाचे ठाणेदार व शहर प्रशासनातर्फे कठोर पावले उचलण्यात आली आहे. नगर प्रशासन व ठाणेदार यांनी कारवाई सुरू करून शहरातील मोक्याच्या जागेवर उभे राहून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची व नागरिकांची कसून तपासणी व चौकशी करीत आहे. तिरोडा नगरपालिकेतर्फे शहरातील किराणा दुकान, फळ विक्रेते व भाजी व्यावसायिकांना सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहे.