भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी पोलिसांची सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:22+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील फार प्राचिन ऐतिहासिक प्रतापगड हे तीर्थस्थान हिंदू-मुस्लीम बांधवाचे श्रद्धास्थान आहे. दर्ग्यावर चादर चढविण्यासाठी याच दिवशी गर्दी असते. ५ दिवस चालणाºया यात्रा महोत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये. वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये प्रतापगड येथे चोख बंदोबस्त लावला आहे. सुमारे ५०० पोलीस कर्मचारी दिवस-रात्र सतर्कता बाळगून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Police vigilance to make it easy for visitors to visit | भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी पोलिसांची सतर्कता

भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी पोलिसांची सतर्कता

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । प्रतापगड यात्रा, पोलीस अधिकाऱ्यांसह ५०० पोलीस कर्मचारी तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतिक असलेल्या हर हर महादेव भोलेबाबा व हजरत ख्वाजा उस्मान गणी हारुनी बाबांचा दरगाचे दर्शन लाखो भाविकांना सुलभरित्या व्हावे. यात्रा परिसरात सर्वत्र शांतता राहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यात्रा महोत्सवात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था व वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील फार प्राचिन ऐतिहासिक प्रतापगड हे तीर्थस्थान हिंदू-मुस्लीम बांधवाचे श्रद्धास्थान आहे. दर्ग्यावर चादर चढविण्यासाठी याच दिवशी गर्दी असते. ५ दिवस चालणाºया यात्रा महोत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये. वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये प्रतापगड येथे चोख बंदोबस्त लावला आहे. सुमारे ५०० पोलीस कर्मचारी दिवस-रात्र सतर्कता बाळगून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. यात्रेत आलेल्या भाविकांना सहजरित्या सर्वप्रकारची मदत मिळावी म्हणून पोलीस उपअधीक्षक, २१ पोलीस अधिकारी, १७५ पोलीस कर्मचारी, ५ सी ६० पथकाचे जवान,असे ५०० पोलीस कर्मचारी प्रतापगडच्या यात्रेत तैनात असून संपूर्ण यात्रा परिसरावर नजर ठेवून आहेत.

हरविलेली मुले आई-वडिलांकडे
भाविकांच्या गर्दीमध्ये आई-वडिलांपासून हात सुटून दुरावलेल्या १० मुलांना त्यांच्या आईवडीलांकडे पोलीस पथकांने स्वाधीन केले.यात्रेच्या पहिल्या दिवशी रेणी सागर राजाभोज (११) गांधी चौक भंडारा, शौर्य किशोर शहारे (१०) बोंडगावदेवी, प्रभाबाई प्रेमलाल कडाम (६५) पालोरा जि. भंडारा यांचा शोध घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. यात्रेकरांना सर्वोतोपरी सहकार्य केले जात असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी सांगितले.

Web Title: Police vigilance to make it easy for visitors to visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस