शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

६० कॅमेरे ठेवणार पोलीस भरतीवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 9:33 PM

गोंदिया जिल्हा पोलीस दलात ९७ जागा रिक्त असून ८५ जागांसाठी पोलीस शिपाई पदभरती प्रक्रीया सुरू झाली आहे. यात ७ मार्च पासून शारिरीक चाचणीला सुरूवात होणार आहे.

ठळक मुद्दे८५ जागांसाठी ७ मार्चपासून भरती प्रक्रिया

ऑनलाईन लोकमतगोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस दलात ९७ जागा रिक्त असून ८५ जागांसाठी पोलीस शिपाई पदभरती प्रक्रीया सुरू झाली आहे. यात ७ मार्च पासून शारिरीक चाचणीला सुरूवात होणार आहे. कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणातच ही भरती प्रक्रीया ६० सिसिटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत घेतली जाणार आहे.६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पोलीस शिपाई भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची वेळ देण्यात आली होती. २८ फेब्रुवारी ही तारीख उमेदवारांची वय निश्चीतीची माणली जाणार आहे. ३ मार्च पर्यंत उमेदवारांना बँकेत चालान भरता येणार आहे. या भरतीसाठी आलेल्या अर्जातील एक हजार उमेदवारांना दररोज शारिरीक चाचणी करीता बोलाविण्यात येणार आहे. पहिल्यांदा पुरूष, नंतर महिला, त्यानंतर माजी सैनिक, खेळाडू व पोलीस पाल्यांना बोलाविण्यात येणार आहे. शारिरीक चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी त्यांना आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसंस, पॅन कार्ड, शाळेचे ओळख प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र या पैकी कोणत्याही दोन कागदपत्रांची झेरॉक्स व सत्यप्रत आणणे आवश्यक करण्यात आले आहे. सोबत १० रंगीत फोटो आणणे आवश्यक आहे.जिल्ह्यात पुरूषांसाठी १६०० मीटर धावणे व महिलांसाठी ८०० मीटर धावणे ही प्रक्रीया पोलीस मुख्यालयाच्या बाहेर असलेल्या बायपास रस्त्यावर यापूर्वी घेतली जात होती. परंतु यंदाच्या भरतीत ही प्रक्रिया पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणातच घेतला जाणार आहे. यासाठी १ किमी. अंतराचा एक ट्रॅक पोलीस मुख्यालयात तयार करण्यात आला आहे.या ट्रकची तपासणी जिल्हा क्रिडा अधिकारी व निरीक्षक वैधमापन (वजनमापे) यांच्याकडून करवून घेण्यात आली आहे. शारिरीक चाचणीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची चाचणी करण्यात आली आहे.यात गोळा फेक, लांब उडी, पूलप्स, १०० मीटर ग्राऊंड वाढविण्यात आले आहे. यात गोळा फेकचे तीन ग्राऊंड, लांब उडीचे ३ ग्राऊंड, पूलप्सचे ४ ग्राऊंड, शंभर मीटरचे २ ग्राऊंड वाढविण्यात आले आहेत. शारिरीक चाचणीच्या दिवशी सकाळी ५ वाजतापासून उमेदवाराला पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात प्रवेश मिळेल. एकाच दिवशी शारिरीक चाचणीचे संपूर्ण इव्हेन्ट घेऊन त्यांना सोबतच गुण सांगितले जाणार आहेत. शारिरीक चाचणीत अपात्र झालेल्या उमेदवारांना बाहेर पडण्यासाठी संच व तंत्र गेटची व्यवस्था करण्यात आली आहे.उमेदवारांना आणावा लागेल कागदपत्राचा संचपोलीस शिपाई पदासाठी अर्ज करताना उमेदवाराने सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचा संच शारिरीक चाचणीच्यावेळी भरतीच्या ठिकाणी आणून सादर करावा लागणार आहे. त्यात हलके वाहन चालविण्याचा परवाना, संगणकाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र, नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असल्यास नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असल्याचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलिअर, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र असा संच शारिरिक चाचणीच्या वेळी पोलिस अधिकाºयांना द्यावा लागणार आहे. या पोलीस भरतीसाठी १०० अधिकारी व ४०० कर्मचाºयांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अल्पोपहारभरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी ९० बाय ६० फूटाचे स्वागत कक्ष मुख्यालयाच्या गेटजवळ उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी उमेदवारांना मदत केंद्र, पिण्याचे पाणी, चहा-नास्ता, आंघोळ व शौचालयाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. उमेदवार ज्या वाहनाने भरतीत येतील त्या वाहनांसाठी पार्र्कींगही तयार करण्यात आली आहे. दोन केळ, बिस्कीट व ग्लुकोजची व्यवस्था पोलिसांकडून राहणार आहे. शिवाय उमेदवाराला आणखी पदार्थ खायचे असल्यास त्याच ठिकाणी पैशाने इतर पदार्थ खरेदी करता येतील. अल्पोपहाराचे तीन ते चार स्टॉल लावण्यात येणार आहेत.पोलीस शिपाई भरतीत गैरप्रकार, भ्रष्टाचार किंवा लाचलुचपतीचे आचरण खपवून घेतले जाणार नाहीत. असे प्रकार करताना कुणी आढळल्यास किंवा तक्रार आल्यास संबंधीतावर शिस्तभंगाची कारवाई तसेच गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. तटस्थपणा, नि:पक्षपातीपणा व पारदर्शीतेने भरतीचे काम करण्यात येईल.-डॉ. दिलीप पाटील भुजबळपोलीस अधिक्षक, गोंदिया.

टॅग्स :Policeपोलिस