पोलीस भरती : २५ जूनला होणार परीक्षा, सर्व तक्रारींचे होणार निवारण
By Admin | Updated: June 21, 2014 01:49 IST2014-06-21T01:49:27+5:302014-06-21T01:49:27+5:30
गोंदिया पोलीस विभागाने ७६ पोलीस शिपाई पदासाठी घेतलेल्या शारीरिक चाचणीसाठी ..

पोलीस भरती : २५ जूनला होणार परीक्षा, सर्व तक्रारींचे होणार निवारण
गोंदिया : गोंदिया पोलीस विभागाने ७६ पोलीस शिपाई पदासाठी घेतलेल्या शारीरिक चाचणीसाठी ४ हजार २०० पेक्षा अधिक उमेद्वारांनी अर्ज केले होते. यात शारिरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेद्वारांची गुणवत्ता यादी जाती निहाय लावण्यात आली. यात १०६८ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
शारीरिक चाचणीत खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण करीता ८४ गुण, होमगार्ड ८०, माजी सैनिक ७५, प्रकल्पग्रस्त ८२, खेळाडू ५६, महिला ५० गुण घेणारे लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत. खुल्या प्रवर्गातील ५५५ उमेदवार लेखी परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहे. इतर मागास वर्गात सर्वसाधारण ७८ गुण, होमगार्ड ५४, माजी सैनिक ७६, प्रकल्पग्रस्त ६४, खेळाडू ६१, अंशकालीन ५४, महिला ६७ गुण घेणारे लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत. इतर मागासवर्गीयातील प्रवर्गातील २२० उमेदवार लेखी परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहे. अनुसूचित जाती वर्गात सर्वसाधारण ५० गुण, होमगार्ड ५९, माजी सैनिक ७८, खेळाडू ७६, महिला ५० गुण घेणारे लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील १३८ उमेदवार लेखी परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहे. अनुसूचित जमाती वर्गात सर्वसाधारण ७४ महिला ६४ गुण घेणारे लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील ७६ उमेदवार लेखी परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहे. विशेष मागास प्रवर्गातील सर्वसाधारण ७२ महिला ६६ गुण घेणारे लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत.विशेष मागास प्रवर्गातील ३० उमेदवार लेखी परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहे. भटक्या जमाती ब प्रवर्गातील सर्वसाधारण ६२, महिला ५६ गुण घेणारे लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत. भटक्या जमाती ब प्रवर्गातील ३० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. भटक्या जमाती क प्रवर्गातील सर्वसाधारण ५८, महिला ५१ गुण घेणारे लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत. भटक्या जमाती क प्रवर्गातील १३ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. भटक्या जमाती ड प्रवर्गातील सर्वसाधारण ७२, महिला ५८ गुण घेणारे लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत. भटक्या जमाती ड प्रवर्गातील ६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. उमेदवारांची लेखी परीक्षा २५ जून रोजी सकाळी १० वाजता भारतीय खाद्य निगमच्या मुर्री येथील गोदाम परिसरात घेण्यात येत आहे.
पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे या गोदामात परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु परीक्षार्थ्यांना सकाळी ८.३० वाजता हजर राहणे आवश्यक असल्याच्या सूचना पोलीस अधिक्षकांनी दिल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
(((20--08)))