पोलीस नायकावर चौघांकडून हल्ला

By Admin | Updated: July 20, 2015 01:22 IST2015-07-20T01:22:41+5:302015-07-20T01:22:41+5:30

वॉरंटमधील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस नायकावर चौघांनी हल्ला केला.

Police heroes attacked by four | पोलीस नायकावर चौघांकडून हल्ला

पोलीस नायकावर चौघांकडून हल्ला

गोंदिया : वॉरंटमधील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस नायकावर चौघांनी हल्ला केला. अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत बोंडगावदेवी येथे मंगळवारी रात्री ८.१५ वाजता दरम्यान ही घटना घडली.
फिर्यादी पोलीस नायक महेंद्र डोमाजी पुण्यप्रडीवार (३३) ब. नं. २३७ हे अटक वॉरंटच्या आरोपीला पकडण्यासाठी बोंडगावदेवी येथे गेले असताना आरोपी धनराज नत्थू झोडे (५०), अनुसया धनराज झोडे (४५), देवानंद धनराज झोडे (३८) व वैशाली देवानंद झोडे (३०) यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. फिर्यादी पोलीस नायक पुण्यप्रेडीवार यांच्या तक्रारीवरून या घटनेसंदर्भात सदर आरोपींविरूध्द भादंविच्या कलम ३५३, ३२५ ब, १८८, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हल्ला करणाऱ्या त्या चौघांना पोलिसांनी शनिवारी (दि.१८) अटक केली आहे.

Web Title: Police heroes attacked by four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.