पोलीस शिपायाची केली ५१ लाख रुपयांनी फसवणूक; शेअर मार्केटचा मोह आला अंगलट
By कपिल केकत | Updated: February 29, 2024 18:50 IST2024-02-29T18:50:11+5:302024-02-29T18:50:30+5:30
विविध खात्यांवर टाकले होते पैसे

पोलीस शिपायाची केली ५१ लाख रुपयांनी फसवणूक; शेअर मार्केटचा मोह आला अंगलट
गोंदिया : शेअर मार्केटमधून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष देत चक्क पोलिस शिपायालाच तब्बल ५० लाख ६० हजार रुपयांची चपत लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला डुग्गीपार येथे घडला आहे.
आरोपी ब्लॅक रॉक इक्विटी असेट मॅनेजमेंट ग्रुप ६०२ च्या व्हॉट्सॲपमधील ग्रुप ॲडमिन आदींनी इंटरनेटवरून फिर्यादी पोलिस शिपाई श्रीकांत भोजराज मेश्राम (३५, नेमणूक पोस्टे डुग्गीपार) यांना शेअर मार्केट संबंधात अनुभवी तज्ज्ञ असल्याचे भासवून शेअर मार्केटच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळेल असे आमिष दिले.
तसेच, श्रीकांत मेश्राम यांना शेअर मार्केट संबंधात बनावट लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करावयास लावले. त्याद्वारे आयपीओची माहिती त्यांना देऊन वेगवेगळ्या बॅंक अकाउंटवर वेगवेगळे कारण सांगून पैसे पाठविण्यास लावले. अशा प्रकारे श्रीकांत मेश्राम यांची ५० लाख ७० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. १८ फेब्रुवारी २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडलेल्या या प्रकारात श्रीकांत मेश्राम यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी भादंवि कलम ४२०, सहकलम ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम २००८ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
विविध मोबाइल क्रमांकांचा केला वापर
या प्रकरणात आरोपींनी ब्लॅक रॉक इक्विटी असेट मॅनेजमेंट ग्रुप ६०२ च्या व्हॉट्सॲपमधील ग्रुप ॲडमिन ७२०९३४७५०७, ९४७२२४८०६५, ९२७९९९१९६३, ६२००१९०७१२, ७८७००२८६४६, ८७९१४९६४६२ त्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील मेंबर व ॲडमिन ८८६४९५४१२२, ९४७०२७६२८८, ८२३५०३५८७२, ९४८२३७८३५३, कस्टमर केअरचा प्रतिनीधी ९५४०६४२०६९ याने व ८१३०८७७६३५, ७९०४१६९३७६ या क्रमांकाच्या कस्टमर केअर म्हणून असलेले प्रतिनिधींनी फिर्यादीला विविध बॅंक खात्यांवर पैसे टाकण्यास सांगीतले होते.