शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चिचबोडी कोंबड बाजारावर पोलिसांचा छापा, ५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 18:14 IST

चिचबोडी तलाव परिसरात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याजवळून ८८ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्दे८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : अर्जुनी मोरगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून बोंडगावदेवी गावालगत जंगल शिवारातील चिचबोडी तलाव परिसरात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याजवळून ८८ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.२) सायंकाळी करण्यात आली.

बोंडगावदेवी ते दिघोरी मार्गावरील जंगलशिवारातील चिचबोडी तलावात अवैधपणे कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावून हारजीतचा खेळ सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी जंगल शिवारात छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहून काहींनी त्या ठिकाणाहून पळ काढला. घटनास्थळी ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या कारवाईत शंकर वामन माटे (३०), वाल्मीक जीवन कुंभारे (२९), जितेंद्र विजय चेटुले (३५), यशवंत दादाजी खंडाईत (४१) सर्व राहणार दिघोरी (मोठी), सचिन केवळराम नाकाडे (३०) बोंडगावदेवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नगदी २ हजार ९१० रुपये जप्त करण्यात आले. दुचाकी क्रमांक होंडा सीडी एमएच ३६ एसी ९२६६, ग्लॅमर हिरो एमएच ३५ -४३२०, बजाज डिसकव्हर एमएच ३६ सी ९९२५ याप्रमाणे तीन दुचाकी असा एकूण ८८ हजार ७१० रुपयांचा ऐवज जप्त केला.

पोलीस हवालदार नरेश गोंडाणे, पोलीस नायब महेंद्र पुण्यप्रेडीवार, पोलीस शिपाई रामलाल राऊत यांनी कोंबड्याच्या झुंजीवर छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळल्याने त्यांच्या विरोधात कलम १२ (अ) मजुका अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. पुण्यप्रेडीवार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारArrestअटकPoliceपोलिसraidधाड