मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित् काव्यवाचन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:21+5:302021-01-24T04:13:21+5:30
मराठी भाषेच्या संवर्धनाचा विचार करताना आपण मराठी भाषेच्या अध:पतनास महाराष्ट्रीय माणूसच कारणीभूत आहे, असे प्रतिपादन डॉ. बिसेन यांनी केले. ...

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित् काव्यवाचन ()
मराठी भाषेच्या संवर्धनाचा विचार करताना आपण मराठी भाषेच्या अध:पतनास महाराष्ट्रीय माणूसच कारणीभूत आहे, असे प्रतिपादन डॉ. बिसेन यांनी केले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संत वाङ्मयातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे व आपल्या भाषेवर आपण प्रेम केले पाहिजे, असे मत प्रास्ताविकातून डॉ. देशपांडे यांनी मांडले. यावेळी विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले. ‘माझी मराठी माऊली, तिची विठोबा साऊली, दीना नामा, तुका एका उभे कैवल्य माऊली’ या काव्यातून मराठीचा गौरव सहोन खान या विद्यार्थिनीने केला. विराणी, मुक्तछंद, गझल, अभंग अशा विविध काव्यप्रकारांती कविता विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केल्या. संचालन प्रा. सुनीता रंगारी यांनी केले. आभार अंशुल अमृतकर या विद्यार्थ्याने मानले. कार्यक्रमासाठी दीप मेश्राम, शिल्पा बहेकार, सुनीता खालेदे, गायत्री गुप्ता यांनी सहकार्य केले.