पांढरीतील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट
By Admin | Updated: November 17, 2016 00:20 IST2016-11-17T00:20:39+5:302016-11-17T00:20:39+5:30
सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान न घेता व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची

पांढरीतील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट
व्यापारी मस्त : शेतकऱ्यांची तोलाई उशिरा, व्यापाऱ्यांना प्राधान्य?
पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान न घेता व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची तक्रार गोंगले येथील शेतकरी डी.यू. रहांगडाले यांनी केली आहे. बुधवारी या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा असंतोष उफाळला होता.
गेल्या ५ नोव्हेंबर २०१६ ला या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन शासकीय गोडाऊन हलबीटोला येथे करण्यात आले. या धान खरेदी केंद्राची चौकशी केली असता बुधवारी प्रथमच १२५८.६० क्विंटल धान खरेदी १४७० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे केल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे या केंद्रावर दरपत्रकही लावलेला नाही. सातबारासुद्धा न तपासताच व्यापाऱ्यांचा धान घेतला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याविषयी चौकशी केली असता सध्या तलाठी वर्गाचे आंदोलन असल्यामुळे सातबारे मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. या पांढरी धान खरेदी केंद्राची चौकशी करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. या केंद्रावर असलेले अधिकारी वर्ग बाहेरगावी कार्यक्रमामध्ये जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. केंद्राची चौकशी करण्याची मागणी केली आहे.