येडमाकोटा ते केसलवाडा रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST2021-03-07T04:26:16+5:302021-03-07T04:26:16+5:30

या परिसरात जवळच दोन कारखाने आहेत. ऊस कारखाना, एलोरा पेपर मिल देव्हाडा येथे कारखाने आहेत. त्यामुळे वरील दोन्ही गावांतील ...

Plight of Yedmakota to Kesalwada roads | येडमाकोटा ते केसलवाडा रस्त्यांची दुर्दशा

येडमाकोटा ते केसलवाडा रस्त्यांची दुर्दशा

या परिसरात जवळच दोन कारखाने आहेत. ऊस कारखाना, एलोरा पेपर मिल देव्हाडा येथे कारखाने आहेत. त्यामुळे वरील दोन्ही गावांतील कामगार रात्री-बेरात्री या कारखान्यात कामावर जात असतात, तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी तुमसर येथे शिक्षण घेण्यास जात असतात. त्यामुळे कमालीचा त्रास सहन करून हा जीर्ण रस्ता पार करावा लागत असतो. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी या रस्त्यांनी दोनचाकी, तसेच चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. या रस्त्यांने वाहने गेल्यानंतर नेहमीच रस्त्यावरील धूर उडत असते. त्यामुळे वाहने जाईपर्यंत अनेक नागरिकांना रस्त्यांच्या कडेला थांबून राहावे लागत. हा रस्ता एकेरी असल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. तरी संबंधित अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून रस्त्यांची दुर्दशा दूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: Plight of Yedmakota to Kesalwada roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.