कारभाराची फेरतपासणी करा
By Admin | Updated: March 27, 2016 01:59 IST2016-03-27T01:59:15+5:302016-03-27T01:59:15+5:30
राज्य शासन ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब नागरिकांसाठी लोकहिताच्या विविध योजना राबवित आहे.

कारभाराची फेरतपासणी करा
सतोना ग्रामपंचायत : २ एप्रिलला भाकपाचे धरणे आंदोलन
रावणवाडी : राज्य शासन ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब नागरिकांसाठी लोकहिताच्या विविध योजना राबवित आहे. मात्र त्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्याऐवजी ग्रामपंचायत सचिव आणी सरपंच आपला मनमर्जी कारभार करू न शासनाच्या विकास निधीची उधळ पट्टी करीत असल्यामुळे येत्या २ एप्रिल भारतीय कॅम्यूनिष्ट पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सतोना ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक व सरपंचांच्या संगणमताने होत असलेल्या गैर कारभाराची व भष्ट्राचाराची निष्पक्ष चौकशी करू न दोषींवर दंन्डांत्यक कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. मात्र त्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण करण्यात येत असून दिलेल्या तक्रारंना केराची टोपली सतत दाखविण्यात येते. करीता या अनियमीत कारभाराची सखोल चौक शी करण्यात यावी म्हणून ९ फेब्रूवारी रोजी सतोना व धामनगांव ग्रांमपंचायतमध्ये भाकपच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत खंड विकास अधिकाऱ्यांनी प्रकरणाच्या चौकशी करिता विस्तार अधिकारी पटले आणि पराते यांची नियुक्ती केली. मात्र गावकऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांची चौकशी न करता दोषींना सुखरुप वाचवून त्यांची पाठराखन करण्यात आली असल्याचे आरोप गावकऱ्यंकडून करण्यात आले आहे.
सतोना ग्रामपंचायतमध्ये अनेक नियमबाह्य कामे होत असल्याने ग्रामसभेने ग्राम रोजगार सेवकाला पदमुक्त करण्याचा ठराव पारित केला. मात्र त्या ठरावाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. नागरिकांना दाखल्याची गरज भासली तर त्यांना विनामुल्य दाखला प्राप्तच होत नाही. शासनाकडून येणाऱ्या लोकहिताच्या योजना गावकऱ्यांना माहिती होत नाही. वृक्षारोपनाच्या कामावर कार्यरत मजुरांना स्वच्छता अभियानाची कामे सोपवून त्या कामाचा निधी वेगळा काढून परस्पर पाहणी करण्यात येत असल्याचे मजुरांकडून बोलले जात आहे. इंदिरा आवास योजने अंतर्गत निर्माण झालेल्या बहुतांश आवासामध्ये शौचालये बांधण्यात आली नाहीत. मात्र निधीची उचल झाली आहे. घरकुल योजनेत समाविष्ट पात्र लााभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले तर अपात्र लोकांना पात्र ठरविण्यात आले.