शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रस्त्याच्या मधोमध वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:56 PM

तिरोडा तालुक्यातील ग्राम घोगरा व देव्हाडा येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. भर उन्हाळ्यात जड वाहनाच्या ये-जामुळे रस्ते फुटले असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली.

ठळक मुद्देरस्ता बंद करण्याचा इशारा : प्रशासनाच्या विरोधात अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : तिरोडा तालुक्यातील ग्राम घोगरा व देव्हाडा येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. भर उन्हाळ्यात जड वाहनाच्या ये-जामुळे रस्ते फुटले असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली.पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था खूप वाईट असते. त्यामुळे पावसाळ्यात बसेस बंद असतात. जनता व विद्यार्थ्यांना गंभीर संकटाचा सामना करावा लागतो. घाटकुरोडा, घोगरा व देव्हाडा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करुन रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आजपर्यंत कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही. या रस्त्याचे काम १२ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सडक योजनेतून करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावरुन पाच रेतीघाट पडतात. यात घाटकुरोड्याचे दोन व ग्राम चांदोरी, बिरोली आणि मुंडीपार येथील प्रत्येकी एक. या घाटावरील रेती वाहून नेणाऱ्या जड वाहनांची संख्या ५०० ते ५५० च्यावर असून सातत्याने वर्दळ असल्याने रस्त्याचे पूर्ण बेहाल झाले आहे.रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने उन्हाळ्यात धूळ घरात जाते. पावसाळ्यातील खड्ड्यात साचलेले पाणी लोकांच्या अंगावर व घरात शिरत आहे. तरी प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित झाला आहे. रेतीघाटच्या कंत्राटदारांना बोलण्याचा प्रयत्न गावकरी करतात तर त्यांच्याशी अरेरावीपणा केली जाते, अशी माहिती जि.प. सदस्य डोंगरे, घोगराच्या सरपंच गीता देव्हारे, पोलीस पाटील चंद्रºहास भांडारकर, उपसरपंच रुपेश भोंडेकर यांनी दिली.रस्त्याच्या दयनिय स्थितीमुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये तिरोडा, घाटकुरोडा-घोगरा मार्गे देव्हाड्याला जाणारी एसटी बस बंद केली जाते. त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची फजिती होते. शासनाचे लक्ष केंद्रीत व्हावे, याकरिता जि.प. सदस्य डोंगरे यांच्या उपस्थितीमध्ये एक उपक्रम राबविण्यात आला. रस्त्यावर मोठ्या स्वरुपाचे खड्डे तयार झाले असून त्या खड्यांत वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच देव्हारे, तंमुस अध्यक्ष सुरेश भांडारकर, ग्रा.पं. सदस्य गंगाधर भांडारकर, उपसरपंच रुपेश भोंडेकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते....तर संपूर्ण रस्त्यावर वृक्षारोपणजिल्हा व तालुका प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. रस्ते नव्याने बनविण्यात आले नाही तर रस्त्यावर पडलेल्या संपूर्ण खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन संपूर्ण रस्ता बंद करु, असा इशारा जि.प. सदस्य डोंगरे, सरपंच देव्हारे, उपसरपंच भोंडेकर व इतर पदाधिकाºयांनी दिला आहे.कंत्राटदाराची अरेरावी, प्रशासन सुस्तकंत्राटदार आणि महसूल विभागाचे सोटेलोटे असल्याने तसेच काही स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने जनतेच्या समस्या व मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. तहसीलदार, एस.डी.ओ. यांच्यासह अनेकांना पैशाचा पुरवठा होत असल्याने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही, असा आरोप जि.प. सदस्य डोंगरे व इतर ग्राम पदाधिकाºयांनी केला आहे. एका वर्षात १० ते २० ट्रॅक्टरवर कारवाई केली जाते. मात्र एकाही जेसीबी मशीन धारकांवर कारवाई केली जात नाही.

टॅग्स :Rainपाऊस