सामान्य ज्ञानासाठी झाडाच्या चबुतऱ्याचा केला उपयोग
By Admin | Updated: October 6, 2014 23:14 IST2014-10-06T23:14:58+5:302014-10-06T23:14:58+5:30
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा ठाणा येथे असलेल्या झाडाच्या चबुतऱ्याचा उपयोग सामान्य ज्ञानाच्या माहितीसाठी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी यासाठी

सामान्य ज्ञानासाठी झाडाच्या चबुतऱ्याचा केला उपयोग
गोंदिया : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा ठाणा येथे असलेल्या झाडाच्या चबुतऱ्याचा उपयोग सामान्य ज्ञानाच्या माहितीसाठी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी यासाठी शाळेत दररोज दैनिक परिपाठामध्ये प्रश्नमंजुषा हा उपक्रम मीना राजू मंचच्यावतीने राबविला जात आहे. रोज पाच प्रश्न विचारले जातात व त्यांची उत्तरे दुसऱ्या दिवशी माहिती करूण आणायला सांगितले जाते. अशा पध्दतीने महिना झाला की सांगितलेल्या प्रश्नावर परिक्षा घेतली जाऊन प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातात. या सामान्य ज्ञान माहितीमध्ये गोंदिया जिल्ह्याचीही माहिती पूर्णपणे अवगत रहावी यासाठी शालेय परिसरात असलेल्या झाडाच्या चबुतऱ्याचा उपयोग केला गेला. त्यावर जिल्ह्यातील प्रमुख नद्या, धरणे, तीर्थस्थळ, तलाव, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, मॅग्नीज खान, विमानतळ, तालुक्याची नावे व इतर माहितीचा समावेश केला गेला आहे. असे विविध उपक्रम, स्पर्धांचे आयोेजन गुणवत्ता वाढीसाठी व सर्वांगीण विकासासाठी ठाणा शाळेत केले जात आहेत.
त्यामुळेच गावची शाळा, आमची शाळा या अभिनव प्रकल्पात प्रभाग, तालुका व जिल्ह्यात शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे. यासाठी तुंडीलाल कटरे, हनुवत वट्टी, चंद्रकुमार भेलावे, गजानन मेश्राम, अशोक बघेले, मुलचंद बघेले, गोपाल हनवते, बेदराज बोपचे, सुरज हनवते, संतोष वंजारी, परशुराम कटरे, शोभेलाल कटरे, प्रमोद वंजारी, सुरेशाम कटरे, अनिरूध्द जोशी, गजानन बिसेन, गंगाराम बावनथडे, गणेश काठेवार, नविंद्र वंजारी, सविता बघेले, पुष्पा कटर े व गावकरी नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. (तालुका प्रतिनिधी)