आमगाव ते तिगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:08+5:302021-07-31T04:29:08+5:30

आमगाव : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या आमगाव ते तिगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ...

Pits on Amgaon to Tigav Road () | आमगाव ते तिगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे ()

आमगाव ते तिगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे ()

आमगाव : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या आमगाव ते तिगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून कुंभारटोली, बिरसी, जामखारी व तिगावकडे जाताना नागरिकांनी चांगलीच कसरत करावी लागत आहे.

तिगाव पुढे तुमसर, चोपा व मांडोदेवीला जाणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे बाजारपेठ करिता या मार्गावरील ग्रामीण भागातील आमगावला येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. या मार्गावर लहान ते मोठी वाहने धावतात असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कित्येक अपघात घडले आहेत. तिगाव रस्त्यावर कुंभारटोली रेल्वे फाटकाजवळ आणि कालव्याजवळील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे टाळण्यासाठी वाहनचालकांना भारी कसरत करावी लागते. तरी या खड्ड्यांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता स्थानिक सार्वजनिक बांधकाम उपविभाग आमगाव अंतर्गत येतो. मागील २ वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाली असून याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. वाहन चालविणे या मार्गावरून अवघड झाले असून ये-जा करणाऱ्या लोकांसाठी धोकादायक ठरत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Pits on Amgaon to Tigav Road ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.