शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

डुग्गीपार बिटातील सागवान वृक्षांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 8:55 PM

सडक-अर्जुनी तालुक्यातील जंगलातील वृक्षांची कत्तल होणे, आता नित्याचीच बाब झाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या डुग्गीपार बिटाअंतर्गत

ठळक मुद्देदोन महिन्यातील दुसरी घटना : गस्तीवर प्रश्नचिन्ह

राजेश मुनीश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी तालुक्यातील जंगलातील वृक्षांची कत्तल होणे, आता नित्याचीच बाब झाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या डुग्गीपार बिटाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -६ वरील शशीकरण पहाडी जवळील जंगलातून दोन महिन्यापूर्वी दोन वृक्षाची कत्तल करुन परस्पर विल्हेवाट लावण्यात आली होती. या प्रकाराची चौकशी सुरू असताना बिट क्रमांक ५५५ मधील सहा सागवान झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार रविवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आला. या बिट क्रमांकापासून वनरक्षकाचे निवासस्थान केवळ अर्ध्या कि.मी.अंतरावर आहे. तालुक्यातील कोहमारा-बाम्हणी/खडकी, पुतळी-शेंडा, डव्वा-दोडके/जांभडी, सौंदड-पांढरी-कोसमतोंडी या मार्गावर रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आह. मात्र गस्तीच्या नावावर झोपा काढण्याच्या प्रकारामुळे जंगलातून मौल्यवान वनसंपतीची लूट होत असल्याचे चित्र आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वन बिट क्रमांक ५५५ या ठिकाणावरुन दोन महिन्यात दोन वेळा सागवान वृक्षांची कटाई करुन नेल्याच्या घटना घडल्या. ही गंभीर बाब आहे. वनकर्मचारी यांनी रात्रीची गस्त वाढवून वन तस्कारांचा शोध घेण्याची गरज आहे. याच परिसरात वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याची चर्चा आहे. संबंधीत वनरक्षकावर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.फिरत्या पथकावर प्रश्नचिन्हया परिसरातील जंगलातून सागवानाच्या वृक्षांची तस्करी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या जिल्ह्यातील फिरत्या पथकावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात जंगलाकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. केवळ प्रवास भत्याची दिनदर्शीका मात्र बरोबर लिहिली जात असल्याची चर्चा आहे. सदर अवैध वृक्ष चोरीची माहिती त्या फिरेपथक अधिकाºयांना नसल्याचे याच विभागातील एका जबाबदार अधिकाºयांनी सांगितले.२८ हजार हेक्टरवरील वनसंपदा धोक्यातसडक-अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत शेंडा, कोहमारा, सौंदड कोसमतोंडी, जांभळी/दोडके, रेंगेपार या ठिकाणी क्षेत्र सहाय्यकाचे कार्यालय आहे. सडक- अर्जुनी तालुक्यात शेंडा, कोसमतोंडी, सौंदड, जांभळी/दोडके, रेंगेपार या क्षेत्रात घनदाट जंगले आहेत. २८ हजार हेक्टर आर क्षेत्र जंगल व्याप्त आहे. येणाऱ्या काळात सागवान चोरांचे प्रमाण वाढल्यास मौल्यवान सागवान वृक्ष नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही, हे विशेष.

टॅग्स :forestजंगल