त्रिलोकेश्वरधामध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 01:48 IST2017-02-24T01:48:20+5:302017-02-24T01:48:20+5:30

तालुक्यात सर्वात मोठे शिवालय तसेच द्वादश ज्योर्तिलिंग असलेले ५१ फूट उंचीचे त्रिफळाचे त्रिशूल असलेले एकमेव स्थळ त्रिलोकेश्वरधाम

Philosophy of Dwashash Jyotirlinga in Trilokeshwar | त्रिलोकेश्वरधामध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन

त्रिलोकेश्वरधामध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन

सालेकसा : तालुक्यात सर्वात मोठे शिवालय तसेच द्वादश ज्योर्तिलिंग असलेले ५१ फूट उंचीचे त्रिफळाचे त्रिशूल असलेले एकमेव स्थळ त्रिलोकेश्वरधाम हलबीटोला येथे महाशिवरात्रीनिमित्त सर्वात मोठी जत्रा भरते. या जत्रेत दिवसभर भाविकांची रीघ लागते. महाशिवरात्रीनिमित्त पाच दिवसीय शिवमहापुराणावर आधारित अध्यात्मिक प्रवचनमाला असल्याने यादरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक येथे येऊन जातात. यंदा ही महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची रीघ लागणार आहे. त्यासाठी आयोजन समितीने जय्यत तयारी केली आहे.
४५ वर्षापूर्वी स्थापित झालेले त्रिलोकेश्वरधाम महाशिवरात्रीला विशेष आकर्षणाचे केंद्र असले तरी द्वादश ज्योतिलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दूर-दूरवरुन भाविक या ठिकाणी येतात आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करतात. सालेकसा रेल्वे स्टेशनपासून २०० कि.मी. अंतरावर असलेले त्रिलोकेश्वरधाम हलबीटोला येथील पहाडावर स्थापित आहे. लगतच घनदाट जंगल, दुर्गम पर्वत, परंतु निसर्गरम्य वातावरण आणि पहाडाच्या पायथ्याशी असलेले मनोहारी जलाशय वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मंदिरांचा समूह हे आकर्षणाचे केंद्र आहे. त्यातच ५१ फूट उंचीचा त्रिशूल आणि त्यात खाली द्वादश ज्योर्तिलिंगाचे भव्य शिवालय, त्या ज्योतीलिंगाची परिक्रमा करण्यात वेगळीच अनुभूती येते.
याच परिसरात १५ फूट उंच भगवान शंकराची मूर्ती उंच पहाडाच्या टोकावर विराजमान आहे. बाजूला शिवजीचे वाहन नंदीची ५ फूट उंच भव्य मुर्ती बसलेल्या अवस्थेत असून शिवाप्रती आपली श्रद्धा दाखवित असल्याचा आभास करुन जाते. सालेकसा ते दरेकसा मार्गावरुन रेल्वेने किंवा बसने प्रवास करीत असताना प्रवाशांना या शिवालयाच्या त्रिशूलाचे आणि शंकरजीच्या मूर्तीचे दुरूनच दर्शन घडते. हलबीटोलाच्या पहाडावर १७ एकर परिसरात असलेल्या त्रिलोकेश्वरधाममध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला ५ दिवसीय प्रवचन, सत्संग सोहळा आयोजित केला जातो. अनेक तपस्वी साधू संत व साध्वी दरवर्षी येथे सत्संग करतात.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Philosophy of Dwashash Jyotirlinga in Trilokeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.