व्यक्तिपूजेला महत्त्व नाही
By Admin | Updated: January 31, 2015 01:48 IST2015-01-31T01:48:15+5:302015-01-31T01:48:15+5:30
पक्ष संघटनेच्या कार्यात कार्यकर्त्यांनी सदस्य मोहिमेला अधिक गती द्यावे. जनतेने पक्षावर विश्वास व्यक्त करुन सत्ता दिली आहे.

व्यक्तिपूजेला महत्त्व नाही
आमगाव : पक्ष संघटनेच्या कार्यात कार्यकर्त्यांनी सदस्य मोहिमेला अधिक गती द्यावे. जनतेने पक्षावर विश्वास व्यक्त करुन सत्ता दिली आहे. त्यांच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. राजकारणातून समाजकारण करण्याचे ध्येय कार्यकर्त्यांनी जोपासावे. पक्ष कार्यकत्यांनी व्यक्तिपूजेला महत्व देऊ नये, असा उपदेशाचा डोज आ.संजय पुराम यांनी येथे कार्यकर्त्यांना दिला.
तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने लक्ष्मणराव मानकर अध्यापक विद्यालय परिसरात सदस्यता मोहिमेतर्गत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आ. केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, पं.स. सभापती हनवंत वट्टी, उपसभापती जयकृष्ण रहांगडाले, गोविंदराव पुंड, जि.प. सदस्य संगीता दोनोडे, तुंडीलाल कटरे, योगीश्वरी पटले, हरिहर मानकर, उमादेवी बिसेन, सुभाष आकरे, मंडळाध्यक्ष अॅड.येशुलाल उपराडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजू पटले व आभार अॅड. उपराडे यांनी केले.
भाजपातील बंडखोरांनी पक्षविरोधी कारवाई पुढे केली. यात जिल्हा परिषद सदस्यांनीही पुढाकार घेतला. यातून पत्रकबाजीला उधाण आले व समर्थकांनी लेखी निवेदन पत्रकारांना वाटून पक्ष सोडण्याचा निर्धार व्यक्त केला. परंतु याच पत्रकाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य तुंडीलाल कटरे, योगेश्वरी पटले, संगीता दोनोडे यांना पत्रकारांनी पक्ष सोडल्याचा प्रश्न केला असता त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले. जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनीही हा विषय वाढविणार नसल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)