राखीव शेतजमिनीच्या विक्रीला परवानगी

By Admin | Updated: March 6, 2015 01:41 IST2015-03-06T01:41:14+5:302015-03-06T01:41:14+5:30

धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत बॅरेजच्या लाभक्षेत्रातील बाधित परिमंडळात येणाऱ्या गावकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी विकण्याची परवानगी काही अटींवर देण्यात आली आहे.

Permission for sale of reserved agricultural land | राखीव शेतजमिनीच्या विक्रीला परवानगी

राखीव शेतजमिनीच्या विक्रीला परवानगी

तिरोडा : धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत बॅरेजच्या लाभक्षेत्रातील बाधित परिमंडळात येणाऱ्या गावकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी विकण्याची परवानगी काही अटींवर देण्यात आली आहे.
धापेवाडा बॅरेजच्या लाभक्षेत्रात कवलेवाडा, मरारटोला, करटी खुर्द या गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे लाभ क्षेत्रातील शेतजमिनींनी विक्री बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मुलीचे लग्न, शैक्षणिक कारणास्तव आपल्या जमीन विक्री करणे आवश्यक वाटत असताना त्यावर निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे स्वत:ची जमीन असतानाही तेथील शेतकऱ्यांना अनेक अडचणी जात होत्या. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ चे कलम ११ (१) अन्वये अधिसूचित झालेल्या व स्लॅबप्रमाणे राखीव ठेवलेल्या जमिनीची विक्री करण्याची परवानगी काही अटीवर देण्यात आलेली आहे. पुनर्वसन अधिकारी, नागपूर विभागीय आयुक्तांच्या पत्र क्र.कलि/पुनर्वसन/विक्री परवानगी/कावि-१२६/१४ दि.१३ फेब्रुवारी अन्वये काही अटी व शर्तीनुसार शेतकऱ्यास जमिन विकण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले आहे. यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी महसूल विभागाकडे हा वि षय मांडला होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Permission for sale of reserved agricultural land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.