सखींनी सादर केला कलाविष्कार

By Admin | Updated: July 21, 2015 01:19 IST2015-07-21T01:19:25+5:302015-07-21T01:19:25+5:30

लोकमत सखी मंच सालेकसाच्या वतीने आयोजित खुल्या नृत्य स्पर्धेत महिला व सखींनी आपल्या कलागुणांना सादर

Performed artwork by Sakhi | सखींनी सादर केला कलाविष्कार

सखींनी सादर केला कलाविष्कार

सालेकसा : लोकमत सखी मंच सालेकसाच्या वतीने आयोजित खुल्या नृत्य स्पर्धेत महिला व सखींनी आपल्या कलागुणांना सादर करीत उपस्थित प्रेक्षकांचे मन मोहून टाकले. प्रथमच लोकमत सखी मंचच्या या आयोजनात महिला व वृध्दांनीसुध्दा आपले कलाकौशल्य सादर केल्याने सालेकसावासीयांना नवल वाटल्याशिवाय राहिले नाही.
येथील गायत्री मंदिर सभागृहात झालेल्या खुल्या नृत्य स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या दुर्गा तिराले होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती हिरालाल फाफनवाडे, जि.प. सदस्य लता दोनोडे, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, राकाँचे महासचिव बबलू कटरे, लोकमत प्रतिनिधी विजय मानकर, लोकमत समाचार संवाददाता गणेश भदाडे, सखी मंच संयोजिका पिंकी कापसे व इतर मान्यवर उपस्थित होते.
एकल नृत्य आणि समूह नृत्य या दोन्ही स्पर्धेत सखींनी दिलखुलास मंचावर येवून आपली नृत्यकला सादर केली. त्याचबरोबर उद्बोधनपर नाटकेही सादर केली. आपल्या प्रास्ताविकात अर्चना गोल्लीवार यांनी महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या लोकमतच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
संचालन प्रिया मनोज शरणागत आणि गणेश भदाडे यांनी तर आभार विजय मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला गुरुकुल कंप्यूटर, कावडे प्रिंटीग प्रेस, धन्वंतरी क्लिनिकल लेबॉरटरी, तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल फुंडे, जिनीयस फोटो स्टुडिओचे निलेश बोहरे यांचे योगदान लाभले. रत्नकला शिंदे यांनी गुणदान करण्याचे काम केले. कार्यक्रमासाठी पिंकी कापसे यांच्या मार्गदर्शंनात किरण मोरे, सुलोचना कवरे, किर्ती कवरे, बबिता कापसे, सुुनिता मेंढे, सवाती रोकडे, सरिता मेश्राम, संतोषी मेश्राम, कंचन गोलेवार, वर्षा घरत, छाया कटरे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

विजेत्यांना मिळाली आकर्षक बक्षिसे
४दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक किर्ती कावरे आणि द्वितीय क्रमांक राणी अग्रवाल यांनी पटकाविला. तसेच समूह नृत्य स्पर्धेत सुनिता शेंडे, पिंकी कापसे, सुलोचना, स्वाती, किरण यांच्या समुहाने प्रथम तर वर्षा घरत, विमल कटरे, विणा कटरे, कावेरी, अंतकला, संगीता यांच्या समुहाने द्वितीय क्रमांक पटकावला. पुरस्कार वितरण सोहळा दिनेश कवरे, महेश कावडे, डॉ. नागपुरे, अनिल फुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

Web Title: Performed artwork by Sakhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.