लोकसेवा करणाऱ्या व्यक्ती घडविणे गरजेचे
By Admin | Updated: February 28, 2015 01:07 IST2015-02-28T01:07:42+5:302015-02-28T01:07:42+5:30
प्रत्येक व्यक्ती स्व:हिताकरिता जीवन जगतो. त्यामुळे सामाजिक सेवेची भावना दुरावत चालली आहे. नागरिकांच्या प्रश्नांना शोधून त्यांचे निराकरण करणाऱ्यांची आज गरज आहे.

लोकसेवा करणाऱ्या व्यक्ती घडविणे गरजेचे
आमगाव : प्रत्येक व्यक्ती स्व:हिताकरिता जीवन जगतो. त्यामुळे सामाजिक सेवेची भावना दुरावत चालली आहे. नागरिकांच्या प्रश्नांना शोधून त्यांचे निराकरण करणाऱ्यांची आज गरज आहे. याकरिता प्रत्येक कुटुंबात लोकसेवा करणारी व्यक्ती घडविण्याची आवश्यकता आहे, असे मत आ. संजय पुराम यांनी व्यक्त केले.
बनगाव ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत भवनात आरोग्य शिबिर व सत्कार कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून माजी आ. भेरसिंग नागपुरे, माजी आ. केशवराव मानकर, पं.स. सभापती हनुवंत वट्टी, उपसभापती जयकृष्ण रहांगडाले, पोलीस निरीक्षक बी.डी. मडावी, सरपंच सुषमा भुजाडे, भाजयुमो तालुका अध्यक्ष जयप्रकाश शिवणकर, यशवंत मानकर, उपसरपंच पृथ्वीपाल सोमवंशी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आले.
या वेळी आ. संजय पुराम यांनी पुढे विकासाच्या दृष्टीने प्रत्येक गावे परिपूर्ण करण्याकरिता शासनाच्या योजनांची पूर्तता करण्याचे आवाहन केले. ग्रामीण परिसरही शहराप्रमाणे विकासाच्या गतीत पुढे व्हावे, यासाठी योजना व निधीचा योग्य वापर होईल या दिशेने आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी विकास कामांना गती देण्याकरिता सर्व पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतींना, नागरिकांना मुलभूत सोई देण्याकरिता कामे करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी ग्रामपंचायतच्या वतीने आ. संजय पुराम व पोलीस निरीक्षक यांनी विकासात्मक कार्यांना गती मिळवून दिल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले. यानंतर आरोग्य शिबिरात जवळपास ३०० रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. शिबिरात तज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णांवर औषधोपचार केले
प्रास्ताविक सरपंच सुषमा भुजाडे, संचालन विरेंद्र अंजनकर यांनी तर आभार उपसरपंच पृथ्वीपाल सोमवंशी यांनी मानले. शिबिरात ज्येष्ठ नागरिक सुखराम फुंडे, ग्रामपंचायत सदस्य मनोज चव्हाण, प्रकाश शिवणकर, प्रमोद शिवणकर, नितीन भसे, दुर्गा चुटे, भारती असाटी, शारदा फुंडे, किरण नागभिडे, सुषमा उईके, आमगावचे सरपंच पद्मा चुटे, क्रिष्णा चुटे, कमलेश चुटे, घनश्याम अग्रवाल, नर्मदा चुटे व ग्रामविकास अधिकारी पी.सी. मेश्राम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)