लोकसहभागातून मलपुरी शाळा झाली डिजीटल

By Admin | Updated: March 14, 2016 01:48 IST2016-03-14T01:48:38+5:302016-03-14T01:48:38+5:30

जि.प. प्राथ. शाळा मलपुरी लोकसहभागातून डिजीटल शाळा नावारूपास आली....

The people went to the school to make the school | लोकसहभागातून मलपुरी शाळा झाली डिजीटल

लोकसहभागातून मलपुरी शाळा झाली डिजीटल

गोरेगाव : जि.प. प्राथ. शाळा मलपुरी लोकसहभागातून डिजीटल शाळा नावारूपास आली. गावातील आदिवासी, गरीब व मध्यम परिस्थितीत असलेल्या सुजान नागरिकांनी शाळेला भरभरून मदत केली.
या शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे, उद्घाटक म्हणून पं.स. गोरेगाव सभापती दिलीप चौधरी, दीप प्रज्वलक म्हणून जि.प. सदस्या ललिता चौरागडे, मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड, विशेष अतिथी म्हणून डायटचे राजेश रुद्रकार, प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती पं.स. गोरेगावचे सुरेंद्र बिसेन, पं.स. सदस्य केवल बघेले, खंडविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, आर.एल. मांढरे, टी.बी. भेंडारकर, एस.बी. खोब्रागडे उपस्थित होते.
यावेळी सभापती कटरे म्हणाले, डिजीटल शाळेचे महत्व तसेच शाळेसाठी वर्गखोली देण्याचे आश्वासन दिले. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी शाळेच्या प्रगतीची आपुलकीने चौकशी केली. विद्यार्थी प्रगती व डिजीटलची माहिती मुख्याध्यापक चाचेरे व बडे यांच्याकडून जाणून घेतली. मी फक्त गावकऱ्यांचे आभार मानायला आलो आहे असे भावोद्गार काढून गावकऱ्यांची मने जिंकली. सभापती दिलीप चौधरी यांनी तंत्रज्ञान शिक्षण देण्यासाठी गावकऱ्यांनी मदत केल्याचे कौतुक केले. उपसभापती सुरेंद्र बिसेन यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे यांनी ज्ञानरचनावाद विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक के.प्र. शहारे यांनी, संचालन सुरज जोशी यांनी केले. आभार पन्नालाल बोपचे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी सरपंच हेमलता मेश्राम, ललिता चव्हाण, बडे, हरिशंकर कटरे, भरत येळे, पन्नालाल बोपचे, शेखर कटरे, साहेबलाल रहांगडाले, ललिता चव्हाण, दिलीप पटले, टेकलाल चव्हाण, छन्नू कापगते, भागवत बिसेन, माया राऊत, विजय बिसेन, टिलक राऊत, घनश्याम बोपचे, तसेच केंद्रातील सर्व शिक्षक, शाळेचे विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The people went to the school to make the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.