पोषाहाराचे महत्त्व सामान्यांना कळावे
By Admin | Updated: September 4, 2016 00:19 IST2016-09-04T00:19:53+5:302016-09-04T00:19:53+5:30
व्यक्तीला जीवनात निरोगी व सुदृढ राहायचे असेल तर पोषाहाराचे महत्व प्रत्येकाला कळले पाहिजे. विशेषत: लहान मूल व गर्भवती मिळालेला

पोषाहाराचे महत्त्व सामान्यांना कळावे
अधिष्ठाता केवलिया : राष्ट्रीय पोषाहार सप्ताह
गोंदिया : व्यक्तीला जीवनात निरोगी व सुदृढ राहायचे असेल तर पोषाहाराचे महत्व प्रत्येकाला कळले पाहिजे. विशेषत: लहान मूल व गर्भवती मिळालेला योग्य पोषाहार वेळेत मिळाले तर त्यांचे आरोग्य चांगले राहील, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यांनी व्यक्त केले.
१ सप्टेंबर रोजी केटीएस जिल्हा सामान्य रु ग्णालयात आयोजित राष्ट्रीय पोषाहार सप्ताहाचे उदघाटक म्हणून डॉ.केवलीया बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल परियाल, मेट्रन निरंजन फुलझेले उपस्थित होते.
डॉ.केवलीया पुढे म्हणाले, कशाप्रकारे आहार घ्यावा याबाबत काही पध्दती आहेत. काही पध्दतीबाबत भ्रम आहेत. आहार तज्ज्ञांनी जनमाणसामध्ये पोषाहारा बाबत असलेला गैरसमज दूर करण्याचे काम करावे. डॉ.पातुरकर म्हणाले, आपण काय खातो, कसे खातो, किती खातो हे आहारात महत्वाचे आहे. मानवी आहारात जीवनसत्व, धातू, खनीजे यांचा समावेश असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने व्यसनापासून दूर राहून सकस आहार घेतला पाहिजे. किती खावे याची सुध्दा मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आरोग्यदेवता धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. १ ते ७ सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या पोषाहार सप्ताहानिमीत्त लावण्यात आलेल्या प्रदर्शनीची पाहणी मान्यवरांनी केली. यावेळी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेले रु ग्ण त्यांचे नातेवाईक, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी विनय पटले, एकता मोगरे, योगेश वलथरे व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. आभार आहारतज्ज्ञ शिल्पा आंबेकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)