योजनांचा लाभ घेण्यास जनतेने पुढे यावे

By Admin | Updated: December 23, 2016 00:52 IST2016-12-23T00:52:00+5:302016-12-23T00:52:00+5:30

ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी केंद्र व राज्य

People should come forward to take advantage of the schemes | योजनांचा लाभ घेण्यास जनतेने पुढे यावे

योजनांचा लाभ घेण्यास जनतेने पुढे यावे

राजू पालीवाल : १०४ लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप
अर्जुनी मोरगाव : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. गाव खेड्यातील सामन्य नागरिक सुखी, संपन्न होण्यासाठी अनुदान तत्वावरील विविध योजना आहेत. गरजू लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी गावपातळीवरील लोकप्रतिनिधींनी जागरुक राहून योजनांची माहिती ग्रामस्थांना द्यावी. सामान्य जनतेचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ पदरी पाडण्यासाठी गावपातळीवरील नागरिकांनी पुढे यावे, असे प्रतिपादन मोरगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच राजू पालीवाल यांनी केले.
मोरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात नवीन गॅस कनेक्शन वाटपाच्या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी ग्रामस्थांना ते मार्गदर्शन करीत होते.
प्रधानमंत्री बीपीएल गॅस कनेक्शन योजनेंतर्गत अर्जुनी मोरगाव येथील इंडेन गॅस वितरण एजंसीमार्फत घरपोच नवीन गॅस जोडणी वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भूमिता लोधी होत्या. याप्रसंगी उपसरपंच राजू पालीवाल, इंडेन गॅस एजन्सीचे संचालक डॉ. राजेश चांडक, व्यवस्थापक प्रदीप कांबळे, छावा संग्रामचे नेते ललीत बाळबुद्धे, ग्रा.पं. सदस्य दयाराम सोनवाने, परसराम लाडे, विश्वनाथ लोधी, राजू शहारे, सुभाष लाडे उपस्थित होते.
याप्रसंगी लाभार्थ्याना मार्गदर्शन करताना राजू पालीवाल म्हणाले, महिलांना स्वयंपाक करण्यासाठी बऱ्याच समस्यांना पुढे जावे लागते. चुलीच्या धुरापासून आरोग्यावर विपरित परिणाम होतात. दारिद्र्य रेषेखाली जीवन व्यतित करणाऱ्या महिलांच्या घरामध्ये गॅसचुला पेटावा म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला बीपीएल गॅस योजना नाममात्र शुल्कामध्ये सुरू केली आहे. त्यांच्या दूरदृष्टीने सामान्य महिलांच्या घरात गॅस पोहोचल्याचे सांगून जनतेने योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राजू पालीवाल यांंनी केले. योजनेस पात्र आहेत अशा सर्व गरजू लाभार्थ्यांना गॅस वाटप केले जाईल, असे डॉ. चांडक यांनी सांगितले.
यावेळी गावातील १०४ लाभार्थ्यांना शंभर रुपये नाममात्र घेवून नवीन गॅस कनेक्शन उपस्थितांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गॅस पेटविताना घ्यायची काळजी याबद्दलची संपूर्ण माहिती इंडेन गॅसचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी देवून संचालन केले. गॅस वितरणासाठी ललीत मस्के, बरखा शहारे, सचिन बोरकर, शुभम शहारे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

गॅस शेगडीचे वाटप करताना उपसरपंच राजू पालीवाल.

Web Title: People should come forward to take advantage of the schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.