चार वर्षांपासून ३३ प्रस्ताव पेंडिंग
By Admin | Updated: October 21, 2015 02:00 IST2015-10-21T02:00:31+5:302015-10-21T02:00:31+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या मागील चार वर्षांपासून झालेल्या नाही.

चार वर्षांपासून ३३ प्रस्ताव पेंडिंग
स्वगावाकडे जाऊ द्या : शिक्षकांची आर्त हाक
गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या मागील चार वर्षांपासून झालेल्या नाही. २०११ पासून गडचिरोली जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचे ३३ प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती उजेडात आली आहे.
आंतर जिल्हा बदल्यावरील स्थगिती उठविण्यात आली असल्याचे परिपत्रक राज्य शासनाकडून गडचिरोली जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. मात्र जि.प.च्या शिक्षण विभागाने आंतर जिल्हा बदलींच्या फाईल निकाली काढण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू केली नाही. त्यामुळे ‘आता तरी आम्हाला आमच्या गावाकडे जाऊ द्या’ अशी आर्तहाक आंतर जिल्हा बदलीसाठी प्रस्ताव टाकलेल्या शिक्षकांकडून जि.प.ला दिली जात आहे.