शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया रेल्वेस्थानकाच्या रेलटोलीकडील पादचारी पूल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST

गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, तसेच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोंदिया रेल्वेस्थानकावरील रेलटोली भागातील पादचारी उड्डाणपूल प्रवाशांसाठी ...

गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, तसेच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोंदिया रेल्वेस्थानकावरील रेलटोली भागातील पादचारी उड्डाणपूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता संसर्ग आटोक्यात असून, हा पूल पुन्हा प्रवाशांसाठी सुरू करण्याची सूचना खा. प्रफुल्ल पटेल यांनी रेल्वे विभाग आणि जिल्हा प्रशासनाला केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी रेलटोली परिसरातील पादचारी पूल सुरू करण्याचे निर्देश रेल्वे विभागाला दिले. त्यानंतर हा पूल बुधवारपासून (दि.२३) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला.

रेलटोली परिसरातील पादचारी पुलावरून बालाघाट आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेस्थानकावर त्वरित पोहोचण्यास मदत होते. मात्र, रेलटोली परिसरातील पादचारी पूल गोंदिया रेल्वे विभागाने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मागील तीन महिन्यांपासून बंद केला होता. यामुळे १ कि.मी.चा फेरा मारून स्थानकावर पोहोचावे लागत होते. त्यामुळे बऱ्याचदा गाडीसुद्धा सुटून जात होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. आता कोरोना संसर्ग आटोक्यात आला आहे. रेलटोली परिसरातील पादचारी पूल प्रवाशांसाठी पूर्ववत सुरू करण्यात यावा संदर्भात खा. प्रफुल्ल पटेल यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती, तसेच डेली मूव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनीसुद्धा जिल्हाधिकारी खवले यांच्याकडे हा पूल सुरू करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी खवले यांनी रेल्वे वाणिज्यक अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा पादचारी पूल प्रवाशांसाठी सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर बुधवारी हा पादचारी पूल सुरू करण्यात आला. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.