सोमवारपर्यंत पीसीआर
By Admin | Updated: February 22, 2015 01:30 IST2015-02-22T01:30:14+5:302015-02-22T01:30:14+5:30
३० हजार रूपयांची लाच घेताना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेल्या सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर रामदास चौरे (३०) यास न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोमवारपर्यंत पीसीआर
गोंदिया : ३० हजार रूपयांची लाच घेताना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेल्या सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर रामदास चौरे (३०) यास न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदाराच्या पत्नी व अकडसासूला अटक करून त्यांच्या जामिनाला विरोध न करण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे यास २० फेब्रुवारी रोजी सापळा रचून सायंकाळी रंगेहात पकडले होते.
याप्रकरणी चौरेविरोधात शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१३ (१)(ड) सह कलमं १३ (२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान पथकाने सपोनी चौरे यास विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यात सदर गुन्ह्यात चौरे व्यतिरीक्त अन्य कुणाचा सहभाग आहे काय, चौरे याने तक्रारदाराकडून यापूर्वी स्वीकारलेली रक्कम जप्त करणे, त्याकडून संबंधीत प्रकरणाचे दस्तावेज प्राप्त करणे तसेच प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. यावर न्यायालयाने सपोनि चौरे यास २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई उपअधीक्षक दीनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, शिवचरण पेठे, सहायक फौजदार दिवाकर भदाडे, हवालदार दीपक दत्ता, शिपाई राजेश शेंदे्र, शेखर खोब्रागडे, योगेश उईके, डिगंबर जाधव, रंजीत बिसेन, मोहन शेंडे, महिला शिपाई वंदना बिसेन यांनी यशस्वी केली. (शहर प्रतिनिधी)