सुर्यवंशी खून प्रकरणातील आरोपीला सोमवारपर्यंत पीसीआर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:27 IST2021-05-22T04:27:31+5:302021-05-22T04:27:31+5:30

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांधी वॉर्ड जुना गोंदिया येथील सुधीर रमेश सूर्यवंशी (३७) याचा बुधवारी (दि.१९) पहाटे ...

PCR till Suryavanshi murder case till Monday | सुर्यवंशी खून प्रकरणातील आरोपीला सोमवारपर्यंत पीसीआर ()

सुर्यवंशी खून प्रकरणातील आरोपीला सोमवारपर्यंत पीसीआर ()

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांधी वॉर्ड जुना गोंदिया येथील सुधीर रमेश सूर्यवंशी (३७) याचा बुधवारी (दि.१९) पहाटे ४.३० वाजता खून करणाऱ्या आरोपी संतोष ऊर्फ पडू गोपाल बन्सोड (२१, रा. गांधी वाॅर्ड) याला अवघ्या दोन तासांत शहर पोलिसांनी अटक केली होती. त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२४) पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी संतोष बन्सोड याने सुधीर सूर्यवंशी (३७) याचा जुन्या भांडणाच्या रागातून काठी व दगडाने मारून खून केला होता. यासंदर्भात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला गुरुवारी (दि.२०) न्यायालयात हजर करण्यात आले होते व त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. अशात न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (दि.२४) पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात शहर ठाणेदार महेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ, मोरे, पोलीस नायक अनिल कोरे, सहायक फौजदार घनश्याम थेर, पोलीस हवालदार सुजित हलमारे, पोलीस नायक सुबोध बिसेन, ओमेश मेश्राम, संतोष बोपचे, प्रमोद चव्हाण, प्रकाश गायधने, श्याम कोरे, संतोष भेंडारकर, छगन विठ्ठले, विकास वेदक यांनी केली आहे.

Web Title: PCR till Suryavanshi murder case till Monday