कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST2019-12-18T06:00:00+5:302019-12-18T06:00:19+5:30

२० टक्के वेतनास सदर कर्मचारी पात्र आहेत. मात्र संच मान्यतेमध्ये पद मंजूर नसल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहे. शाळा संचालकांनी नोकरी देऊनही शासनाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सदर कर्मचाºयांवर उपासमारीची पाळी आली आहे.संच मान्यतेमध्ये पद मंजूर नसल्याने कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता होता आल्या नाही.

Pay junior college faculty staff | कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन द्या

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन द्या



कर्मचाऱ्यांची मागणी : शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात अनेक शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र संच मान्यतेत पद मंजूर न झाल्याने कर्मचारी अडचणीत आले आहेत. त्यांचे पद मंजूर करुन वेतन देण्याची मागणी शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या वेळी दिलेल्या निवेदनातून विना अनुदान तत्वावर सुरु असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात अनेक शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाने सन २०१३-१४ पर्यंत दरवर्षी होणाºया संच मान्यतेत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पद मंजूर केले होते. परंतु सन २०१४-१५ पासून संच मान्यतेत सदर कर्मचाऱ्यांचे पदच दिलेले नाहीत. पद नसतानाही नोकरीच्या आशेने सदर पदावर बरेच कर्मचारी कार्यरत आहेत.
यातच शासनाने १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन परिपत्रकानुसार विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना सरसकट २० टक्के अनुदान जाहिर केले आहे. त्यामुळे सरसकट २० टक्के अनुदान जाहीर केले आहे.
त्यानुसार २० टक्के वेतनास सदर कर्मचारी पात्र आहेत. मात्र संच मान्यतेमध्ये पद मंजूर नसल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहे. शाळा संचालकांनी नोकरी देऊनही शासनाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सदर कर्मचाºयांवर उपासमारीची पाळी आली आहे.संच मान्यतेमध्ये पद मंजूर नसल्याने कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता होता आल्या नाही.
त्यामुळे सदर कर्मचाºयांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विना अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालय २० टक्के अनुदान मंजूर झाल्याने त्यांच्या आशा प्रज्वलीत झाल्या आहेत. त्यासाठी शासनाने सन २०१४-१५ पासूनच्या संच मान्यतेत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पद मान्य करावे व वैयक्तिक मान्यता देऊन त्यांना नियमानुसार वेतन द्यावे, अशी मागणी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने केली आहे.
शिष्टमंडळात अध्यक्ष रमेश फुंडे, सचिव सुभाष चुलपार, उपाध्यक्ष विजय मोटघरे, सहसचिव एच. के. कुंभलकर, आर. एस. मेश्राम, आर. एस. बोम्बार्डे, एस. टी. कुंभलकर, एन.बी.दुबे, बी.एच.रहांगडाले, एम.आर.कुंभलकर, आर.के.अग्रवाल, कैलाश बोरकर, विजय पोगळे यांचा समावेश होता.

Web Title: Pay junior college faculty staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.