शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
2
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
3
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
4
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
5
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
6
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
7
डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
8
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
9
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
10
रवींद्र चव्हाणांनी शब्द दिला, १०० टक्के भाजपाचं तिकीट तुम्हालाच, मग अचानक रात्री काय घडलं?
11
AI मुळे नोकऱ्या जाणार का? आनंद महिंद्रा यांनी मांडले 'ब्रेन गेन'चे सूत्र; नव्या वर्षात युवकांना दिला यशाचा मंत्र
12
Switzerland Blast: स्वित्झर्लंड हादरलं! न्यू इयर सेलिब्रेशन सुरू असतानाच रिसॉर्टमध्ये भीषण स्फोट; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
13
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
14
Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात
15
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
16
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
17
12 Grape Theory: घड्याळाचे १२ ठोके अन् १२ द्राक्ष; नवं वर्षात चमकेल नशीब; काय आहे 'ग्रेप थ्योरी', तरुणाईला लावलं वेड
18
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
19
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
20
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूल पाडण्यासाठी पुन्हा ‘तारीख पे तारीख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याची बाब लोकमतने यासंदर्भात पाठपुरावा करुन प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. तर रेल्वे विभागाने सुध्दा जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून रेल्वे ट्रॅक परिसरातील काही भाग केव्हाही कोसळण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच हा जीर्ण पूल पाडण्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.

ठळक मुद्देरेल्वे विभागाकडून मंजुरीस होतेय विलंब : साडेसहा कोटी रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून हा पूल जडवाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. हा जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. जीर्ण उड्डाणपूल सहा महिन्यात पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. रेल्वे विभागाकडून उड्डाणपूल पाडण्यासाठी तारीख पे तारीख दिली जात असल्याने शहरवासीयांवरील धोका वाढत आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याची बाब लोकमतने यासंदर्भात पाठपुरावा करुन प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. तर रेल्वे विभागाने सुध्दा जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून रेल्वे ट्रॅक परिसरातील काही भाग केव्हाही कोसळण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच हा जीर्ण पूल पाडण्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्यात हा पूल जीर्ण झाला असून तो जडवाहतुकीस सुरू ठेवण्यास योग्य नसल्याची बाब पुढे आली होती. जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी रेल्वे विभागाने सहा महिन्याची मुदत दिली होती. मात्र याला आता दोन वर्षांचा कालावधी लोटला असून अद्यापही केवळ रेल्वे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे.जुन्या जीर्ण उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात येत असल्याने पूल पाडताना रेल्वेचा मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. तसेच काही तांत्रीक बाबींसाठी रेल्वे प्रशासनाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आत्तापर्यंत रेल्वे विभागाला तीनदा पत्र दिले आहे. मात्र त्यांनी यात काही त्रृट्या काढल्याने २६ मे २०२० रोजी त्रृट्या दूर करुन प्रस्ताव रेल्वे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांची मंजुरी मिळताच पूल पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया काढून पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पूल पाडण्यासाठी एजन्सीची निवडगोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी शासनाने ६ कोटी ५० लाख रूपयांची तरतूद केली आहे.पूल पाडण्यासाठी मुंबई येथील एका एजन्सीची निवड देखील करण्यात आली आहे. रेल्वे विभागाची मंजुरी मिळताच पूल पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करुन काम सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र रेल्वेकडून मंजुरी मिळण्यास पुन्हा किती कालावधी लागतो आणि शहरवासीयांना पुन्हा किती दिवस जुन्या जीर्ण उड्डाणपुलाचा धोका पत्कारावा लागतो हे सांगणे मात्र अवघड आहे.शहरवासीयांवरील धोका कायमशहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल पूर्णपणे जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर प्रश्नावर प्रशासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे.त्यामुळे शहरवासीयांवरील धोका कायम आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे सुध्दा दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे