लोकमत न्यूज नेटवर्कमुरदोली : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस संघटनेच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले व माजी केंद्रीय मंत्री व खा. प्रफुल्ल पटेल यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पटोले यांच्यासोबत पोलीस पाटलांनी आपल्या मागण्यांवर चर्चा केली. पटोले यांनी पोलीस पाटलांच्या मागण्या रास्त असून याकरीता संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांना नागपूर अधिवेशनामध्ये येऊन भेटण्याचे निमंत्रण दिले. पटेल यांनी पोलीस पाटलांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, जिल्हाध्यक्ष दिलीप मेश्राम, गडचिरोली जिल्हाध्यक्ष शरद पाटील, ब्राम्हणवाडे, सचिव मुरारी, दहीकर, रमेश टेंभरे, कोषाध्यक्ष श्रीराम झिंगरे, सचिव राजेश बंसोड, तुकडोजी डोंगरवार, योगेश नाकाडे, महिला अध्यक्ष मंदा ठाकरे, उपाध्यक्ष अनिता लंजे, रंजना कोटांगले यशोधरा नंदेश्वर, लोकचंद भांडारकर, आशा बोपचे, चंपा लिल्हारे, राजेश फुंडे, शिवलाल सराटे यांच्यासह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.
पोलीस पाटलांनी केला पटोलेंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST