शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

रुग्णांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 06:00 IST

पत्रकार परिषदेला आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे उपस्थित होते. पालकमंत्री अनिल देशमुख म्हणाले गोंदिया शासकीय रुग्णालयांसदर्भात अनेक तक्रारी आहेत. या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये सुध्दा समन्यवयाचा अभाव आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबई येथे आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थित बैठक घेऊन या सर्व समस्या मार्गी लावण्यात येतील असे सांगितले.

ठळक मुद्देअनिल देशमुख : मेडिकलमधील अनियमितता दूर करण्याचे निर्देश, जिल्हा वार्षिक योजनेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न दोन्ही रुग्णालयांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे. औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची रिक्त पदे आणि सोयी सुविधांचा अभाव व वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाचा मुद्दा देखील रखडला आहे. जिल्ह्यातील रूग्णांना दर्जेदार आरोग्याच्या सोयी मिळाव्यात यासाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. मात्र समन्वयाअभावी रुग्णांची गैरसोय होत असून ती खपवून घेतली जाणार नाही. वैद्यकीय महाविद्यालयातील अनियमितता दूर करण्यासाठी आरोग्यमंत्र्यासह बैठक घेणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी (दि.२४) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेला आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे उपस्थित होते. पालकमंत्री अनिल देशमुख म्हणाले गोंदिया शासकीय रुग्णालयांसदर्भात अनेक तक्रारी आहेत. या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये सुध्दा समन्यवयाचा अभाव आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबई येथे आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थित बैठक घेऊन या सर्व समस्या मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारीत आहे. त्यामुळे कृषी विषयक योजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. सन २०१९-२० या वर्षात शेतकरी बचत गटांकरिता कृषी अवजारे बँक उघडण्यासाठी २ कोटी ४६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक शाळांमध्ये अध्ययनस्तर निश्चिती व गुणवत्ता विकास करण्यासाठी ७६ कोटी रुपयांच्या निधी तरतूद केली आहे. तर महसूल विभागाचा रेकार्ड आॅनलाईन व अद्यावत करण्यासाठी २ कोटी रुपये आणि प्राथमिक शाळांमध्ये जलशुध्दीकरण यंत्रासाठी ७७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नियोजन भवन आहे. त्याच धर्तीवर गोंदिया येथे नियोजन भवन उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.ग्रामपंचायतीचा थकीत असलेला मग्रारोहयोच्या कुशल कामांचा १८ कोटी रुपयांचा निधी लवकरच देण्यात येईल. तसेच जास्तीत जास्त प्रमाणात पादंण रस्ते तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे रोजगार उपलब्ध होण्यास देखील मदत होईल असे सांगितले.कृषी पंपाचा बॅकलॉग पूर्णपणे दूर करणारगोंदिया जिल्ह्यात कृषी पंपाच्या जोडणीचा मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे. जिल्ह्यातील आमदार आणि लोकप्रतिनिधीनी सुध्दा ही समस्या आपल्यासमोर मांडली. शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या जोडण्या त्वरीत देण्यात यावे.तसेच अर्ज केलेला एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाºयांना दिले आहे. पुढील आठवड्यात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह नागपूर येथे बैठक घेऊन हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावण्यात येईल.तांदूळ घोटाळ्याची चौकशी करणारशासनाकडून भरडाईसाठी तांदळाची उचल राईस मिलर्सनी केली. मात्र काही राईस मिलर्सनी अद्यापही जवळपास ५०० कोटी रुपयांचा तांदूळ शासनाकडे जमा केला नाही. हा प्रश्न मागील दोन वर्षांपासून प्रलबिंत आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल असे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.पुढील वर्षी दीडशे युवकांना मुंबईला पाठविणारमुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या मॅराथॉनमध्ये गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आठ युवकांनी सहभागी घेऊन यश प्राप्त केले. या सर्व युवा खेळाडूंचा २६ जानेवारीला मुख्य शासकीय कार्यक्रमात सत्कार करण्यात येईल. तसेच पुढील वर्षी जिल्ह्यातून दीडशे युवकांना मॅराथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविण्यात येईल. तसेच त्यांचा सर्व खर्च शासन करेल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.कलेक्टर आणि एसपी देणार धान खरेदी केंद्राना भेटजिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर बराच सावळागोंधळ सुरू आहे. तर राईस मिलर्सकडून भरडाई केलेला तांदूळ स्विकारतांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ घेतल्या जात असल्याच्या तक्रारी आहे. तर बाहेरुन आलेले गुणवत्ता नियंणत्रक याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ही सर्व अनियमितता दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक हे काही केंद्राना भेटी देऊन याची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख