तंत्रशिक्षणामुळे सर्वांगिण विकासाची वाटचाल
By Admin | Updated: January 2, 2017 00:47 IST2017-01-02T00:47:48+5:302017-01-02T00:47:48+5:30
दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या अनेक वाटा फुटतात, परंतु नेमका कोणता मार्ग निवडावा

तंत्रशिक्षणामुळे सर्वांगिण विकासाची वाटचाल
डे यांचे प्रतिपादन : फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा
आमगाव : दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या अनेक वाटा फुटतात, परंतु नेमका कोणता मार्ग निवडावा याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलिटेक्नीक यांच्या संयुक्तवतीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ नागपूर विभागाचे उपसचिव डॉ.एस.जे. पाटील व सहसचिव ए.जे. फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
तीन दिवसीय मेळाव्याचे मार्गदर्शन श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी.के. संघी, पॉलीटेक्नीक कॉलेजचे प्राचार्य संदीप हनुवते, बी.एड. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य जे.यु. बन्सोड, डी.टी.एड. कॉलेजचे प्राचार्या ए.ए. सड्डल यांनी केले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे मार्गदर्शन कालावधीत जि.प. हायस्कुल रिसामा, आदर्श विद्यालय, विद्यानिकेतन हायस्कुल, रविंद्र ज्यु. कॉलेज चोपा, पी.डी. रहांगडाले विद्यालय गोरेगाव, रामकृष्ण ज्यु. कॉलेज कुऱ्हाडी, ग्रामविकास विद्यालय तिरखेडी, सालेकसा हायस्कुल सालेकसा, जि.प. हायस्कुल कावराबांध येथे मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आले.
या मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून प्राचार्य सुनील निनावे, प्राचार्य डी.एम. राऊत, कमलबापू बहेकार, आर.के. डे. एच.डी. कावळे, एम.एन. कोटांगले, पी.आर. पटेल, एन.एम. सोनवाने, ओ.एस. गुप्ता, डॉ. डी.के. संघी, संदीप हनुवते, प्रभारी प्राचार्य जयंत बन्सोड, पी.बी. कटरे, के.एस. पात्रीकर, एन.जे. कथलेवार, पी.डी. कटरे, एम.आर. तिवारी, डी.एस. बोरकर यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मार्गदर्शकांनी तंत्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान काय हे माहिती झाले. या अभ्यासक्रमाच्या माध्यमाने विद्यार्थ्यांसह राष्ट्रविकासाची चालना मिळाली व तंत्रशिक्षणामुळे विकासाची वाटचाल सुरू झाली असे मत व्यक्त केले. सदर मेळाव्यांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबद माहिती मिळाली. तंत्रशिक्षणामुळे विकासाची वाटचाल सुरू झाली असे मत आर.के.डे यांनी व्यक्त केले. सदर मेळाव्यांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबद माहिती, शालांत अभ्यासक्रमानंतर तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत विविध अभ्यासक्रमााची माहिती व शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती बाबत मार्गदर्शन, अल्प कालावधीचे अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना व पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
सदर आयोजित फिरते तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे प्रतिनिधी जी.पी. पटले यांनी मांडले. संचालन करून आभार एन.जे. कथलेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. पंकज कटरे, नरेंद्र कावळे, यशवंत मानकर, भरत नागपुरे, मनिष मेश्राम यांनी सहकार्य केले.