पटेल यांनी निवड केलेल्या पाथरीचा कायापालट करणार

By Admin | Updated: November 25, 2014 22:57 IST2014-11-25T22:57:48+5:302014-11-25T22:57:48+5:30

खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार आदर्श गाव योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाचा आर्थिक, सामाजिक विकास साधून कायापालट करण्याचा निर्धार आ.राजेंद्र जैन

Patel will replace the chosen stone | पटेल यांनी निवड केलेल्या पाथरीचा कायापालट करणार

पटेल यांनी निवड केलेल्या पाथरीचा कायापालट करणार

गोंदिया : खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार आदर्श गाव योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाचा आर्थिक, सामाजिक विकास साधून कायापालट करण्याचा निर्धार आ.राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला. पाथरी येथे भेट देऊन गावाची पाहणी केल्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधताना आ.राजेंद्र जैन बोलत होते.
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आदर्श गाव घडविण्यासाठी गोरेगाव तालुक्याच्या पाथरी गावाची निवड केली आहे. या गावाची पाहणी करण्यासाठी व नागरिकांशी वार्तालाप करून समस्या जाणून त्याची सोडवणूक कशा पध्दतीने करता येईल, याचा आढावा घेण्यासाठी आ.जैन यांनी पाथरी गावाला भेट दिली.
यावेळी गोरेगाव तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. खासदार पटेल यांनी आदर्श गाव घडविण्यासाठी पाथरी गावाची निवड केल्याबद्दल पाथरी येथील नागरिकांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गावकऱ्यांनी खा.पटेल यांचे आभार मानले. आ.राजेंद्र जैन यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन करताना आ.जैन म्हणाले, खा.पटेल यांनी दूरदृष्टी ठेऊन आदर्श गाव बनविण्यासाठी पाथरी गावाची निवड केली आहे. या गावाचा सर्वागिण विकास करून कायापालट करण्याची जबाबदारी आता सर्वाची आहे. अधिकाऱ्यांनी गावातील समस्यांची तत्काळ सोडवणूक करुन पाथरीला आदर्श गाव बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष केवलराम बघेले, खंडविकास अधिकारी पुराम, पाथरीच्या सरपंच आशा खांडवाये, उपसरपंच ईश्वरलाल राऊतकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जियालाल कटरे, पोलीस पाटील सोमराज बघेले, माजी सरपंच जियालाल बघेले, डॉ.सी.आर. कटरे, माजी पंचायत समिती सदस्य मुलचंद खांडवाये, माजी जि.प. सदस्य पुष्पनबाई भुरकुडे, डॉ. बी.टी.बघेले, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश कटरे, ग्रा.पं. सदस्य हनीब मो. शेख, निर्मला देशकर, धुर्पता चनाप, शकुंतलाबाई वडगाये, रोशन बिसेन, गोपीचंद भोयर, नानेश्वर शहारे, भोजराज कटरे, डॉ. सुरेश तिरेले, केंद्र प्रमुख शहारे, मुख्याध्यापिका राऊत, पटले, सी.ए. रहांगडाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत आरोग्य विभाग, कृषि विभाग, बांधकाम विभाग, आय.सी.डी.एस. विभागाचे कर्मचारी यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Patel will replace the chosen stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.