प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला अटक

By Admin | Updated: August 27, 2016 00:05 IST2016-08-27T00:05:56+5:302016-08-27T00:05:56+5:30

रेल्वे प्रवाशातील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील ३ सदस्यांना गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली.

The passengers were arrested for robbing the gang | प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला अटक

प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला अटक

५० हजार लुटले होते : रेल्वे पोलिसांची कारवाई
गोंदिया : रेल्वे प्रवाशातील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील ३ सदस्यांना गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली. या आरोपींना न्यायालयाने २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उडीसा येथील मजूरांना मारहान करुन त्याच्या तीन बॅग चोरुन नेणाऱ्या या छत्तीसगड मधील आरोपींना अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले.
सौरभ चंद्रकांत बुराडे (२४) रा. नवापारा जिल्हा महासमुद्र छत्तीसगड, अनिल जीवन सिन्हा रा.डगनीया जि. रायपूर व शत्रुघ्न नरोत्तम दांडी (२८) रा. मोवा जि.रायपूर या तिघांना अटक करण्यात आली. या आरोपींनी ३० जुलैच्या रात्री १२ वाजता गाडी क्रमांक १८४२२ अजमेर पुरी एक्सप्रेसमध्ये ओडीसाच्या बोईदीपूर येथील बुुधियासिंह पतलसिंह (२६) आपल्या तीन सोबत्यासोबत अहमदाबास येथून स्वगावी अजमेरपुरी एक्सप्रेसने परतत असताना सामान्य बोेगीच्या बर्थखाली बुधियासिंह याचा मित्र रंजीतसिंह बॅगची निगरानी करीत होता. तर उर्वरित मित्र झोपले होते. रात्री १२ वाजता गाडी गोंदिया स्टेशनवर येताच त्या बोगीत तीन-चार अज्ञात इसम चढले. यावेळी त्यांनी रंजीतसिंहला बसायचे आहे असे सांगून वाद घालून रंजीतसिंहला मारहाण केली. यावेळी रंजीतसिंहचे सोबती ही जागे झाले.त्या तिघांनी रंजीतसिंहला व त्यांच्या मित्राला मारहाण केली सोबतच ब्लेडने वार केले व तिघेही पळाले. पळतांना त्यांच्या बॅग घेऊन गेले. यात ५० हजार रुपये, मोबाईल होता. या संदर्भात जखमींना उपचारासाठी दुर्ग येथे दाखल करुन गुन्हा नोंद केला. सदर गुन्हा तपासासाठी गोंदिया रेल्वे पोलिसांना पाठविला. या प्रकरणात भादंविच्या कलम ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपासात पोलिसांनी संबंधित गाडीच्या पायलट व गार्डसोबत संपर्क केल्यावर सालेकसाच्या पुर्वी जंगल परिसरात चैन पुलिंग करुन गाडी थांबविण्यात आली होती.
गोंदिया रेल्वे पोलिसांनी आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस कोठडी मिळविली आहे. सदर कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गाडगे, हवालदार महाजन, शैलेष उके, अमोल तुमाने यांनी कारवाई केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The passengers were arrested for robbing the gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.