प्रवाशांना २१ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:20+5:30

रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी सातत्याने विशेष अभियान राबविले जाते. मात्र तरिही बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. यातच मंडळ रेल प्रबंधक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक के.वी.रमणा यांच्या मार्गदर्शनात वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी तिकीट तपासणी कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बल .....

Passenger fine of Rs 21 lakh | प्रवाशांना २१ लाखांचा दंड

प्रवाशांना २१ लाखांचा दंड

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे विभागाचे विशेष तिकिट तपासणी अभियान : ८८४७ प्रकरणांची केली नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विना तिकीट रेल्वेत प्रवास करणाऱ्यांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी ९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान दक्षिण-पूर्व- मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या वाणिज्य विभागाकडून राबविण्यात आले. यात ८८४७ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून प्रवाशांना २१ लाख २९ हजार ३१५ रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी सातत्याने विशेष अभियान राबविले जाते. मात्र तरिही बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. यातच मंडळ रेल प्रबंधक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक के.वी.रमणा यांच्या मार्गदर्शनात वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी तिकीट तपासणी कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या मदतीने ९ ते २२ फेबु्रवारी दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान राबविले.यामध्ये बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांचे एक हजार १६८ प्रकरण हाती लागले. ज्यामध्ये संबंधितांकडून सहा लाख ४० हजार ५६५ रूपये दंड वसुल करण्याात आला.
त्याचप्रकारे अनियमीत तिकीटांचे दोन हजार ५३० प्रकरण पकडण्यात आले. ज्यामध्ये संबंधितांकडून नऊ लाख ६३ हजार ८२५ व बिना माल बुक करून सामान ठेवणाऱ्यांचे पाच हजार १४९ प्रकरण पकडून त्यांना पाच लाख २४ हजार ९२५ रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
अशाप्रकारे १४ दिवस राबविण्यात आलेल्या या विशेष अभियानात एकूण आठ हजार ८४७ प्रकरणांत रेल्वेने २१ लाख २९ हजार ३१५ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कचरा फेकणाऱ्यांनाही दिला दणका
देशात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात असून आपल्या सारखेच आपण वावरत असलेला परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात आहे. स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात असून स्वच्छता हाच उत्तम आरोग्याचा मंत्र म्हणून जनजागृती केली जात आहे. अशात मात्र कित्येकांना स्वच्छतेची पथ्य दिसते. अशात कचरा फेकणाऱ्या १०१ प्रकरणांत या विशेष अभियानंर्तत १० हजार ३०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: Passenger fine of Rs 21 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे