राजभवनच्या घेराव आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:29 IST2021-01-20T04:29:36+5:302021-01-20T04:29:36+5:30
शेतीविषयक तीन कायदे केंद्र सरकारने रद्द करावे यासाठी दिल्लीच्या सीमेवर गत ५० दिवसांपासून देशातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. सन ...

राजभवनच्या घेराव आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग
शेतीविषयक तीन कायदे केंद्र सरकारने रद्द करावे यासाठी दिल्लीच्या सीमेवर गत ५० दिवसांपासून देशातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. सन २०१४ मध्ये पेट्रोलवर असलेले ९.२० रुपये उत्पादन शुल्क २०२० मध्ये ३२.९८ रुपये व डिझेलवर असलेले ३.४६ रुपये उत्पादन शुल्क ३१.८३ रुपये मोदी सरकारने वाढवून डिझेल, पेट्रोलच्या किमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली. गॅस सिलिंडरच्या किमतीत गेल्या १५ दिवसात १०० रुपयाने वाढ करण्यात आली. याचा निषेध म्हणून काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेवराव किरसान, आमादार अभिजित वंजारी, प्रदेश सचिव अमर वराडे, गोंदिया तालुका अध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, शहर अध्यक्ष जहीर अहमद, महासचिव अरुण गजभिये, तालुका समन्वयक परेश उजवणे, अनिल दहिवले, लीलाधर ताराम, तिरोडा शहर अध्यक्ष ठमेंद्र चव्हाण, तालुका समन्वयक रमेश टेंभरे, सलाम, गोरेगाव तालुका अध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, प्रेमलाल भगत, रूपेंद्र दिहारे, माणिक मौजे, डॉ. गणराज कुंभडे, मदन कोटांगले, भीमराज चौरागडे, आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव मोतीराम पिहिदे सहभागी झाले होते.