अंध विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी
By Admin | Updated: January 12, 2017 00:21 IST2017-01-12T00:21:08+5:302017-01-12T00:21:08+5:30
नॅशनल असोसिएशन फॉर ब्लार्इंड (एनएबी) मुंबई शाखा कोल्हापूर मार्फत राज्यस्तरीय अंध विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा

अंध विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी
समावेशित शिक्षण : गोंदियातील १२ विद्यार्थी रेल्वेने झाले रवाना
गोंदिया : नॅशनल असोसिएशन फॉर ब्लार्इंड (एनएबी) मुंबई शाखा कोल्हापूर मार्फत राज्यस्तरीय अंध विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा ११ ते १३ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण गट साधन केंद्र पंचायत समिती गोंदिया अंतर्गत निवड झालेल्या एकूण १२ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरून महाराष्ट्र एक्सप्रेसने गोंदिया रेल्वे स्थानकावरून पाठविण्यात आले. त्यांच्यासह विशेष शिक्षक व समावेशित शिक्षण तज्ज्ञसुद्धा रवाना झाले आहेत.
अपंग विद्यार्थ्यांचा एखादा अवयव नियतीने हिरावून घेतला असला तरी ते आपली कमतरता न मानता ताकद समजून त्यांना शिक्षणाच्या प्रत्येक्ष क्षेत्रात भाग घेण्याची संधी, स्टेज व प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम सर्व शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागातील कर्मचारी, विशेष शिक्षक व समावेशित शिक्षण तज्ज्ञ यांच्याकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. एनएमबी संस्था अंध मुलांसाठी वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धा दरवर्षी आयोजित करते. या स्पर्धेला गोंदिया तालुक्यातील जीईएस हायस्कूल पांढराबोडी येथील वर्ग नववीचा होमेंद्र पुण्यकुमार नागपुरे या विद्यार्थ्याला पाठविण्यात आले आहे.
संपूर्ण विद्यार्थ्यांना स्पर्धेला पाठविण्यासाठी पं.स. उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, गट शिक्षणाधिकारी राजन घरडे, समावेशित शिक्षण तज्ज्ञ राजेश मते, बुद्धभूषण सोनकांबळे यांनी प्रत्यक्ष मुलांना, कर्मचाऱ्यांना व पालकांना समुपदेशन व मार्गदर्शन करून त्यांचा उत्साह वाढविला. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविण्याची त्यांना प्रेरणा मिळाली.
तसेच इतर तालुक्यातील समावेशित शिक्षण तज्ज्ञ वालदे, धावडे, सोनवाने, पटले, खोब्रागडे, राजकुमार गौतम, सिंगनजुडे, रागीट, चव्हाण, विजय ठोकणे, मूलवार यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)