‘परमात्मा एक सेवक’ मंडळाला लागला गाव स्वच्छतेचा ध्यास

By Admin | Updated: October 16, 2015 02:35 IST2015-10-16T02:35:27+5:302015-10-16T02:35:27+5:30

येथील परमात्मा एक सेवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाव स्वच्छतेचा संकल्प ग्रामसभेत केला.

A 'Parmatma Ek Sevak' Mandal was started for the village cleanliness | ‘परमात्मा एक सेवक’ मंडळाला लागला गाव स्वच्छतेचा ध्यास

‘परमात्मा एक सेवक’ मंडळाला लागला गाव स्वच्छतेचा ध्यास

बोंडगावदेवी : येथील परमात्मा एक सेवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाव स्वच्छतेचा संकल्प ग्रामसभेत केला. ग्रामसभेत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीची निवड करण्यात आली. याच सभेत गावातील परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने महिन्यातून दोन दिवस ग्रामसफाई करण्यात येईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी गावातील बहुतांश सर्वसामान्य नागरिक दारूच्या आहारी गेले होते. कित्येकांच्या संसाराची राखरांगोळी झाली होती. दारुच्या नशेत अनेक कुटुंबाच्या घरी कलह निर्माण झाला होता. पती-पत्नीच्या नात्यामधील दरी दुरावत होती. अशा कुटुंबांनी अखेर परमात्मा एक सेवक मंडळाचा सहारा घेतला. आज शेकडो कुटुंब मंडळाचे हितचिंतक झाले. त्यांच्या संसारात गोडवा निर्माण झाला. बाई-बाटली दूर झाली. घरात आर्थिक स्थैर्य नांदू लागले. पोर- बाळं गोड्या गुलाबीने वावरताना गावात दिसत आहेत.
आपले कुटुंब सन्मार्गी लावून गावातही आपले योगदान राहावे म्हणून परमात्मा एक सेवक मंडळाचे शेकडो हितचिंतक गावात ग्रामसफाई करण्यासाठी पुढे सरसावले. गावात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समितीचे अध्यक्ष पतीराम मेश्राम, सचिव राजू ठवरे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठित करण्यात आली. समिती गठित होताच गावातील परमात्मा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हातात झाडू घेवून ग्रामसफाई करण्यात आली. महिन्यातून दोन दिवस गावात ग्रामसफाई करण्याचे काम मंडळाच्या वतीने केले जाणार आहे.
ग्रामसफाई शुभारंभाप्रसंगी सरपंच राधेशाम झोळे, समितीचे अध्यक्ष पतीराम मेश्राम, सचिव राजू ठवरे, सदस्य दिनेश फुल्लूके, साधू मेश्राम, शालिक बोरकर, परमात्मा एक सेवक मंडळाचे व्यंकट शेंदरे, भाऊदास बरैया, महादेव मेश्राम, रामू मेश्राम, प्रेम सिखरामे, रुपचंद मेश्राम, विमल मेश्राम, रेखा मेश्राम, शिला मेश्राम, छाया मानकर, रामदास मेश्राम, वैशाली मानकर, रेखा सिखरामे, जगन नेवारे, पतीराम देवरे, गणेश बरैया आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: A 'Parmatma Ek Sevak' Mandal was started for the village cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.