शास्त्री वॉर्डातील मनोहर तरारे यांनी आपल्या घरी घराच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावून, घराच्या समोरील दाराला बाहेरून कुलूप लावून वरच्या माळ्यावर ऑनलाईन मोबाईलवर सट्टा लावून जुगार खेळवित होता. या माहितीवरून पंचाच्या समक्ष २६ ऑक्टोबरच्या रात्री ...
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढल्याचा फायदा चोरटे घेताना दिसत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मोबाइलदेखील चोरीला जात असून बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय, बाजार परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला गेली आहेत. ...
दिवसेदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे काटेपेटीच्या कच्च्या मालाचीही दरवाढ झाली आहे. परिणामी, ५ प्रमुख काडेपेटी कंपन्यांनी नुकताच दरवाढीचा निर्णय घेतला आहे. काडेपेटी तयार करण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो. यात १ किलो फॉस्फरसचे दर ४२५ रुपयांनी वाढून ...
कोरोना संसर्ग काळात रेल्वेने विशेष गाड्या सुरू करीत त्याच्या तिकीट दरात दुप्पट वाढ केली होती. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आली असताना सुध्दा विशेष गाड्या नियमित करून वाढविलेले तिकिटाचे दर कमी केले नाही. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावरील भुर्दंड अजूनही ...
राज्यातील बहुतांश शाळांत शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ५०० शिक्षक पदे रिक्त आहेत. यामध्ये मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शिक्षक पदांचा समावेश आहे. ...
गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेचे वेळेत सिझर न केल्याने नवजात शिशूचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि विलंब केल्यानेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. ...
मागील दोन वर्षांपासून राज्यातील तब्बल ६३ हजार ५१७ शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहेत. यात सर्वाधिक शेतकरी परभणी, यवतमाळ, अहमदनगर, बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. ...
गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत हावडाकडून येणाऱ्या मेल एक्स्प्रेसमधील आरक्षित डब्यात रेल्वे प्रवाशांचे लेडीज पर्स, सोन्याचे दागिने व रोख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग ना ...
दीड लाख लाेकसंख्या असलेल्या गोंदिया शहरातील केरकचऱ्याची विल्हेवाट सध्या नगरपरिषदेकडून शहरालगतच्या मोकळ्या जागेवर केली जात आहे. मात्र, हा कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने या परिसरालगतच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच केंद्र सरक ...