धानपीक अंकुरले
By Admin | Updated: October 3, 2016 01:18 IST2016-10-03T01:18:44+5:302016-10-03T01:18:44+5:30
हलके धान कापणीला आले असताना सततच्या पावसामुळे धानाची नासाडी झाली आहे.

धानपीक अंकुरले
भरपाईची मागणी : पावसाने नासाडी
शेंडा-कोयलारी : हलके धान कापणीला आले असताना सततच्या पावसामुळे धानाची नासाडी झाली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या धानाला अंकूर फुटल्याचे दिसून येत आहे.
परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्यामुळे वेळेवर पेरणी करून रोवणी केली जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे रोवणीच्या वेळेस पाऊस दगा देतो व धान कापणीला येताच मोठ्या प्रमाणावर पाऊस येतो. अशातच धानाची नासाडी होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. असाच प्रकार यंदाही घडत आहे. सध्या शेंडासह परिसरातील कोयलारी, मसरामटोला, आपकारीटोला, मोहघाटा, उशिखेडा, पांढरवानी, सालईटोला व प्रधानटोला येथील शेतकऱ्यांचे हलके धान कापणी योग्य झाले आहे.
अशात सतत येणाऱ्या पावसामुळे हलक्या धानाची नासाडी होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर काही शेतकऱ्यांच्या धानाला अंकूर फुटल्याचेही दिसून येत आहे.
कृषी व महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या धानाचे सर्वेक्षण करून त्यांना त्वरीत आर्थिक मदत करावी अशी मागणी केली शेतकऱ्यांकडून केली जात आहे.