धान उत्पादकांना शासन देणार मदत
By Admin | Updated: April 5, 2015 01:20 IST2015-04-05T01:20:00+5:302015-04-05T01:20:00+5:30
धान उत्पादक शेतकऱ्यांना शानुग्रह राशी देण्याबद्दल धान उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी वित्तमंत्री सुधिर मुगंटिवार ...

धान उत्पादकांना शासन देणार मदत
तिरोडा : धान उत्पादक शेतकऱ्यांना शानुग्रह राशी देण्याबद्दल धान उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी वित्तमंत्री सुधिर मुगंटिवार यांच्या अध्यक्षतेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून सरसकट रुपये ७५०० प्रतिहेक्टर मदत देण्याची मागणी केली.
शेतीचे झालेले नुकसान व पिकाला कमी भाव असल्यामुळे आज धान उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडला असून शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे लाभ मिळालेले नाही, असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या धान उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व आमदारांना आश्वस्त करुन सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७५०० रुपये सानुग्रह अनुदान राशी देण्यात येईल असे सांगितले.
यावेळी प्रामुख्याने आमदार विजय रहांगडाले, आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशिवार, आ. रामचंद्र अवसरे, आ.देवराव होळी, आ. नाना श्यामकुळे, आक. राजीव तोडसाम उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)