शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक शेतकऱ्यांची यंदा पुन्हा होणार कोंडी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:38 IST

धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने वाढली अडचण : पोर्टलवर अद्याप नोंदणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करून हमीभावाने धान खरेदी करते पण यंदा अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील धान उत्पादक दीड लाखांवर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी हलक्या धानाची विक्री करुन त्यातून मिळणाऱ्या पैशांतून दिवाळी साजरी करतात. हीच बाब लक्षात घेऊन दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात धान खरेदीला सुरुवात केली जाते. यंदा शासनाने धानाला प्रति क्विंटल २३३० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाहेर यापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदीसाठी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीला सुरुवात केली नाही. त्यामुळे नोंदणीच सुरू झाली नाही तर धान खरेदीला सुरुवात कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दिवाळीपूर्वी धानाची विक्री करुन उधार उसनवारी व सण उत्सव साजरे करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न सुध्दा भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची यंदाही कोंडी होण्याची शक्यता आहे तर गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धानाची विक्री करण्याची वेळ आली आहे. 

हलक्या धानाची कापणी मळणी सुरू जिल्ह्यात यंदा खरिपात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. त्यात हलक्या धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. सध्या हलक्या धानाची कापणी आणि मळणी जोरात सुरू आहे. काही शेतकरी हलके धान विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहे. पण शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना अल्प दराने धानाची विक्री करावी लागत आहे.

खरेदी केंद्र सुरू करण्याच्या विषयावर मुंबईत आज बैठक जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे शासकीय धान खरेदी केंद्र व ऑनलाइन नोंदणी सुरू करण्याच्या संदर्भात मंगळवारी (दि.८) मुंबई मंत्रालयात बैठक आयोजित केली असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीत या दोन्ही विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPaddyभातCropपीकgondiya-acगोंदिया