थकबाकीचे ओझे जड
By Admin | Updated: January 6, 2015 23:02 IST2015-01-06T23:02:14+5:302015-01-06T23:02:14+5:30
कर वसुलीच्या मुद्द्यावरून गोंदिया नगर परिषद सध्या चांगलीच चर्चेच आणि वांद्यात आली आहे. सुमारे ११ कोटींच्या कर वसुलीचा डोंगर सध्या पालिकेवर आहे. विशेष म्हणजे यातील लक्षावधीची रक्कम

थकबाकीचे ओझे जड
संस्था प्रतिष्ठिनांकडे १.०४ कोटी
गोंदिया : कर वसुलीच्या मुद्द्यावरून गोंदिया नगर परिषद सध्या चांगलीच चर्चेच आणि वांद्यात आली आहे. सुमारे ११ कोटींच्या कर वसुलीचा डोंगर सध्या पालिकेवर आहे. विशेष म्हणजे यातील लक्षावधीची रक्कम शहरातील नामवंत धनाढ्यांकडे अडकून पडली आहे. यात काही संस्था, बँका आणि शासकीय कार्यालयेही मागे नाहीत. येत्या अडीच महिन्यांत पालिकेला ही थकबाकी वसूल करण्याचे ‘टार्गेट’ पूर्ण करायचे आहे.
शहरातील ‘टॉप-१०’ थकबाकीदारांमध्ये गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचा नंबर सर्वात वर लागतो. बाजार समितीकडे ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी आहे. यात काही बँकांसह गोंदियाच्या तहसील कार्यालयाचाही समावेश आहे.
करवसुलीच्या बाबतीत येथील पालिकेची दैनावस्था कुणापासून लपलेली नाही. यासाठी शहरवासीयांची मानसिकता म्हणा वा कर वसुली विभागाची कमजोरी, मात्र पालिकेवर कर वसुलीचे डोंगर वाढतच चालले आहे. आजघडीला पालिकेला सन १९९३ पासूनचे सुमारे सात कोटी थकीत व सन २०१४-१५ चे सुमारे ३.७५ लाख रूपयांचे कर अशाप्रकारे एकूण सुमारे ११ कोटी रूपये शहरवासीयांकडून वसूल करायचे आहेत. पालिकेला वसूल करावयाच्या या रकमेतील सर्वाधीक रक्कम शहरातील नामवंत धनाढ्यांकडेच थकून असल्याची माहिती आहे. यात काही शासकीय संस्थांचाही समावेश असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)