गादमाशीच्या प्रादुर्भावामुळे धानपीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST2021-09-17T04:35:22+5:302021-09-17T04:35:22+5:30

अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची लागवड केली जाते. या हंगामात मान्सूनने जुलै आणि ऑगस्टमध्ये दगा ...

Outbreaks appear to be exacerbated during the monsoon season | गादमाशीच्या प्रादुर्भावामुळे धानपीक उद्ध्वस्त

गादमाशीच्या प्रादुर्भावामुळे धानपीक उद्ध्वस्त

अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची लागवड केली जाते. या हंगामात मान्सूनने जुलै आणि ऑगस्टमध्ये दगा दिला. परिणामतः धान पिकांवर गाद रोगाने हल्ला चढवून पिकांचे अतोनात नुकसान केले आहे.

विविध संकटांमुळे आधीच धान उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या हंगामात वातावरणातील बदलामुळे धान पिकावर गादमाशीसह विविध कीड, रोगांनी हल्ला चढवून पिकांची नासाडी केली. यामुळे उत्पादनात प्रचंड घट आहे. शेतकऱ्यांना लागवडीसाठी आलेला खर्च निघणेही कठीण आहे. या हंगामातील उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांची घट येण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घ्यावी. विविध कीड, रोगांमुळे झालेल्या धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत. हा अहवाल नुकसान भरपाईसाठी शासनास सादर करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे यांनी खा. प्रफुल्ल पटेल व जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

160921\img-20210915-wa0004.jpg

गादमाशीचा नायनाट करण्यासाठी किटनाशक फवारणी करतांना शेतकरी

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during the monsoon season