रबी धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST2021-04-21T04:29:32+5:302021-04-21T04:29:32+5:30
भटक्या समाजाची समस्या संपता संपेना बोंडगावदेवी : पोटाची खळगी भरण्यासाठी ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या म्हणीप्रमाणे लोहार समाज भटकंती करून ...

रबी धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव
भटक्या समाजाची समस्या संपता संपेना
बोंडगावदेवी : पोटाची खळगी भरण्यासाठी ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या म्हणीप्रमाणे लोहार समाज भटकंती करून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे. यासाठी गावोगावी फिरून मिळालेल्या पैशातून ते आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, त्यांच्या समस्या कायम आहेत.
सडक योजनेच्या रस्त्याची दुरवस्था
तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले; परंतु यापैकी अनेक रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तंटामुक्त गाव अभियान नावापुरतेच
सडक- अर्जुनी : राज्य शासनाच्या तंटामुक्ती गाव अभियान योजनेला गावागावांतील राजकीय गटबाजी आणि अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे ग्रहण लागल्याने या अभिनव योजनेचा फज्जा उडाला आहे.
रिफ्लेक्टरअभावी अपघातांत वाढ
देवरी : वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात हे केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे दिसते.
निराधार लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले
आमगाव : कोरोनामुळे घराबाहेर पडू शकत नसलेल्या वृद्ध व दिव्यांगांना विशेष साहाय्य योजनेचा लाभ मिळवून देता यावा यासाठी ‘गृहभेट आपुलकीची’ ही संकल्पना अमलात आणली जात आहे.
प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
गोंदिया : व्यापारी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ग्राहक, व्यापाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे.
किसान सन्मान योजनेपासून वंचित
पांढरी : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेक लाभ मिळाले. वारंवार शासकीय उंबरठा झिजवावा लागतो.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता
गोंदिया : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भराव घालण्यात आला असला तरी भरावाचे साहित्य पुन्हा रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. अवागमनास अडथळा निर्माण होत आहे.
खतांचा अतिवापर धोकादायक
बोंडगावदेवी : चांगले पीक घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत आहेत; परंतु अलीकडे या खतांचा अतिवापर होत आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता अन्न प्रशासन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ
सौंदड : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे आजारांत वाढ झाली आहे.
पिकाच्या संरक्षणासाठी झटका मशीन वरदान
नवेगावबांध : ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची वन्यप्राण्यांपासून नासाडी होत आहे, अशा शेतकऱ्यांना झटका मशीन म्हणजे एक वरदानच आहे. तरी शेतकऱ्यांनी या झटका मशीनचा वापर पिकांच्या संरक्षणासाठी करावा, असा सल्ला मातीपरीक्षण केंद्राचे जिल्हा नियंत्रण अधिकारी आर.एम. रामटेके यांनी दिला आहे.
कोरोनामुळे विकासाची घडी विसकटली
पांढरी : गावविकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, कोरोनाच्या प्रभावामुळे ग्रामपंचायतीला कराची रक्कम वसूल करता आली नाही. त्यामुळे गावविकासाची घडी विसकटल्याचे चित्र आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजासह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे मोबाइलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
कार्यालयातून तक्रारपेट्या गायब
आमगाव : शासकीय- निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. या हेतूने शासकीय कार्यालयांत तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र, आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत.